नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. पण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग घेणं आवश्यक असल्याचंही सीतारामण म्हणाल्या. cheaper and costlier in budget 2022
अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असतो. त्यामुळेच, यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल. cheaper things in budget 2022
स्वस्त
कपडे, चामड्याचा वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल फोन, चार्जरहिऱ्याच्या वस्तू, दागिनेशेतीची अवजारेकॅमेरा लेन्सेस स्वस्त होणारविदेशातून येणाऱ्या मशिन्सचप्पल आणि बुट्सइंधन स्वस्त होण्याची शक्यताइम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणारमहाग
छत्र्या महाग होणारक्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग