Join us  

Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, एक वर्षासाठी मिळणार डेटा आणि फ्री कॉलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 5:17 PM

टेलिकॉम कंपन्यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक आकर्षक प्लान्स अस्तित्वात आहेत. अगदी सर्वात स्वस्त डेली डेटा प्लानपासून ते अगदी लॉन्ग टर्म वार्षिक प्लानपर्यंत तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील.

नवी दिल्ली-

टेलिकॉम कंपन्यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक आकर्षक प्लान्स अस्तित्वात आहेत. अगदी सर्वात स्वस्त डेली डेटा प्लानपासून ते अगदी लॉन्ग टर्म वार्षिक प्लानपर्यंत तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील. पण यात ग्राहकांना अगदी योग्य प्लान निवडणं कधी कधी खूप मुश्कील होऊन बसतं. कारण प्रत्येक युझरची गरज वेगवेगळी असते आणि व्हॅल्यू फॉर मनी प्लान शोधणं अशावेळी खूप कठीण काम असतं. 

रिचार्ज प्लान निवडताना सर्वात आधी तुम्हाला असलेली गरज तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. जिओ आणि वोडफोन प्रमाणेच एअरटेलच्या पोर्टफोलियोमध्ये आकर्षक प्लान्सचा समावेश आहे. कंपनीकडून वार्षिक प्लान देखील दिला जातो. जर तुम्ही व्हॅल्यू फॉर मनी प्लानच्या शोधात असाल जो दिर्घकालीन व्हॅलिडिटी ऑफर करत असेल तर एअरटेलचे लॉंग टर्म प्लान देखील तुम्ही तपासून पाहू शकता. 

Airtel चे वार्षिक रिजार्च प्लान्सकंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये तीन वार्षिक प्लान्सचा समावेश आहे. जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत नसाल तर कंपनीच्या सर्वात स्वस्त वार्षिक प्लान आहे. यात युझरला ३६५ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यासाठी तुम्हाला १७९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. युझरला यात डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि इतर फायदे मिळतात. या प्लानमध्ये एकूण मिळून २४ जीबीचा डेटा मिळतो. प्लान संपूर्ण व्हॅलेटिडीसह उपलब्ध आहे. यात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स, रोमिंग कॉल्ससह एकूण ३६०० एसएमएसचा फायदा मिळतो. 

एअरटेलच्या रिचार्ज प्लानसोबत तुम्हाला Apollo 24/7 Circle चं तीन महिन्यांचं फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळतं. याशिवाय फास्टॅगवर १०० रुपयांचं कॅशबॅक मिळवता येईल. युझर्स फ्री हेलो ट्यून आणि Wynk Music चा देखील फायदा घेऊ शकतात. 

इतर दोन प्लान्स कोणते?एअरटेलच्या वार्षिक प्लानमध्ये आणखी दोन फायदेशीर रिचार्ज प्लान्स आहेत. यात २,९९९ रुपयांचा जबरदस्त प्लान आहे. या रिचार्जमध्ये युझरला ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि दैनंदिन पातळीवर २ जीबी डेटा उपलब्ध आहे. या रिचार्जमध्ये दैनंदिन पातळीवर १०० एसएमएस फ्री आहेत. 

तिसरा प्लान ३,३५९ रुपयांचा आहे. यात युझर्सना दैनंदिन पातळीवर २.५ जीबी इंटनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह SMS आणि Disney + Hotstar Mobile चं एका वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळतं. 

टॅग्स :एअरटेल