Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वात स्वस्त दारू गोव्यात, कर्नाटकात ८३ टक्के टॅक्स; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत काय स्थिती

सर्वात स्वस्त दारू गोव्यात, कर्नाटकात ८३ टक्के टॅक्स; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत काय स्थिती

इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशनच्या रिपोर्टनुसार प्रत्येक राज्यात याची किंमत निराळी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:31 PM2023-09-25T16:31:13+5:302023-09-25T16:37:56+5:30

इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशनच्या रिपोर्टनुसार प्रत्येक राज्यात याची किंमत निराळी आहे.

Cheapest liquor in Goa 83 percent tax in Karnataka Read what is the situation in other states maharashtra | सर्वात स्वस्त दारू गोव्यात, कर्नाटकात ८३ टक्के टॅक्स; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत काय स्थिती

सर्वात स्वस्त दारू गोव्यात, कर्नाटकात ८३ टक्के टॅक्स; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत काय स्थिती

Liquor Prices Difference: देशातील काही राज्यांमध्ये मद्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु काही अशी राज्य आहेत, ज्या ठिकाणी मद्याच्या किंमती मात्र कमी आहे. देशात सर्वात स्वस्त दारूच्या बाबतीत गोवा पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. तर कर्नाटकात सर्वात महाग दारू मिळते. उदाहरणातून समजायचं झालं तर ज्या मद्याची किंमत गोव्यात १०० रुपये आहे, त्यासाठी दिल्लीत १३४ रुपये मोजावे लागतात. तर त्याच मद्यासाठी कर्नाटकात ५१३ रुपये द्यावे लागतात. इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशनच्या रिपोर्टनुसार व्हिस्की, रम, व्होडका आणि जीनची किंमत प्रत्येक राज्यात निराळी आहे.

गोव्याच्या तुलनेत पाचपट किंमत
व्हिस्की, रम, व्होडका आणि जीनची किंमत गोव्याच्या तुलनेत कर्नाटकात पाच पटींनी अधिक आहे. गोव्याच्या तुलनेत राजस्थान, महाराष्ट्रात या किंमती दुपटीपेक्षा अधिक आहेत. गोव्यात एमआरपीवर ४९ टक्के टॅक्स आहे, तर कर्नाटकात एमआरपीवर ८३ टक्के टॅक्स आहे. दिल्लीत हाच कर ६२ टक्के आणि महाराष्ट्रात तो ७१ टक्के आहे. राज्यांमध्ये टॅक्सच्या किंमतीतील फरकामुळे दिल्ली आणि मुंबईत स्कॉच आणि व्हिस्की ब्रँड्सच्या किंमतीत २० टक्क्यांपर्यंत फरक आहे.

किती आहे किंमत
इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशनच्या डेटानुसार ७५० एमएलच्या जॉनी वॉकरची किंमत दिल्लीत ३१०० रुपये आहे, तर मुंबईत ती ४ हजार रुपये आणि गोव्यात ती ३२५० रुपये आहे. ७५० एमएलच्या जॅक डॅनिअल्स ओल्ड नंबर ७ च्या विस्कीची किंमत दिल्लीत २.७८० रुपये, तर मुंबईत ती ३२५० रुपये आणि गोव्यात ती २८०० रुपये आहे. तर दुसरीकडे पॉल जॉनच्या ७५० एमएलच्या बाटलीची किंमत दिल्लीत २५०० रुपये, मुंबईत ४२५० रुपये आणि गोव्यात २१०० रुपये आहे. ब्लॅक डॉग सेंटेनरी स्कॉचच्या ७५० एमएलच्या बाटलीची किंमत दिल्लीत १५८० रुपये, मुंबईत २०८० रुपये आणि गोव्यात ती १३९० रुपये आहे.

कर्नाटकात एमआरपीवर ८३ टक्के टॅक्स आकारला जातो. तोच तेलंगणमध्ये ६८ टक्के, महाराष्ट्रात ७१ टक्के, राजस्थानमध्ये ६९ टक्के, उत्तर प्रदेशात ६६ टक्के, हरयाणात ४७ टक्के, दिल्लीत ६२ आणि गोव्यात ४९ टक्के आहे.

 

Web Title: Cheapest liquor in Goa 83 percent tax in Karnataka Read what is the situation in other states maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.