नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीसाठी जनरल प्रोव्हिडंट फंड (General Provident Fund- GPF) आणि अशा प्रकारच्या इतर फंड्ससाठी व्याज दरांची घोषणा केली आहे. GPF आणि अशा प्रकारचे इतर फंड सब्सक्राइबर्स, जे केंद्र सरकारचेकर्मचारी आहेत, त्यांना तिसऱ्या तिमाहीत 7.1 टक्के रिटर्न मिळत राहील. कारण केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी GPF व्याजदरात कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. त्यामुळे हा दर 7.1 टक्काच राहील. सरकारने गेल्या तिमाहीतही GPF मध्ये कसल्याही प्रकारचा बदल केलेला नव्हता. (Check details about GPF interest rate, general provident fund rates for october to december quarter declared.)
अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाच्या बजेट डिविजनने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली. यात वर्ष 2021-22 दरम्यान, जनरल प्रोव्हिडंट फंड (GPF) आणि इतर तत्सम फंडच्या ग्राहकांच्या ठेवींवरील व्याजदर 7.1 टक्के असेल. तसेच हा दर 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल, असे म्हणण्यात आले आहे.
छोट्या बचत योजनेवरील व्याजदर कायम -
केंद्र सरकारने यापर्वी ऑक्टोबर-डिसंबर 2021साठी पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), NSC (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि इतर छोट्या बचत योजनांच्या व्याज दरांत कसल्याही प्रकरचा बदल केला नव्हता. चालू तिमाहीसाठी पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के एवढा आहे.
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराचा एक निश्चित भाग जनरल प्रॉव्हिडंट फंडामध्ये टाकता येतो. कोणताही सरकारी कर्मचारी नोकरी दरम्यान या फंडात गुंतवणूक करतो आणि सेवानिवृत्तीच्या वेळी हे पैसे काढू शकतो.
या फंड्सवर लागू होईल नवा व्याजदर -
1 ऑक्टोबर 2021 पासून ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीसाठी 7.1 टक्के व्याजदर लागू असलेले फंड्स असे... -
- जनरल प्रोव्हिडंट फंड (Central Services)
- काँट्रिब्यूटरी प्रोव्हिडंट फंड (India)
- द ऑल इंडिया सर्व्हिसेज प्रोव्हिडंट फंड
- द स्टेट रेल्वे प्रोव्हिडंट फंड
- द जनरल प्रोव्हिडंट फंड (Defence Services)
- द इंडियन ऑर्डिनन्स डिपार्टमेन्ट प्रोव्हिडंट फंड
- द इंडियन ऑर्डिनन्स फॅक्ट्रीज वर्कमेन्स प्रोव्हिडंट फंड
- द इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमेन्स प्रोव्हिडंट फंड
- द आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रोव्हिडंट फंड
- द डिफेंस सर्विसेज ऑफिसर्स प्रोव्हिडंट फंड