लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘सर्वांसाठी घर’ अशी संकल्पना ठरवून २०२२ पर्यंत देशात कुणीच बेघर राहू नये, यासाठी केंद्र सरकारने योजना आणल्या आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी ‘एचडीएफसी लिमिटेडची साहाय्यक कंपनी ‘एचडीएफसी रेड’ने पर्याय उपलब्ध केला आहे. त्याआधारे गृहकर्जासंबंधीच्या आपली पात्रता एका क्लिकवर पडताळता येईल.
www.hdfcred.com/clss या लिंकवर जाऊन स्वत:चे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नोंदविले की पात्र असलेल्या सवलती आणि त्यातून अनुदान याची माहिती मिळते. मध्यम उत्पन्न गटालाही प्रधानमंत्री योजनेत घेण्यात आले आहे. अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा या योजनेत समावेश आहे. याच्या पात्रतेचे निकष सोपे करून पोहोचविण्यासाठी ‘एचडीएफसी रेड’ने सीएलएसएस कॅल्क्युलेटरची निर्मिती केली आहे. वंचित घटकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी सुशिक्षितांनी साहाय्य करावे, असे आवाहन ‘एचडीएफसी रेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहेल आय एस यांनी केले आहे.
गृहकर्ज पात्रता पडताळा एका क्लीकवर!
सर्वांसाठी घर’ अशी संकल्पना ठरवून २०२२ पर्यंत देशात कुणीच बेघर राहू नये, यासाठी केंद्र सरकारने योजना आणल्या आहेत.
By admin | Published: May 26, 2017 01:38 AM2017-05-26T01:38:51+5:302017-05-26T01:38:51+5:30