Join us  

पाहा Reliance Jio चे जबरदस्त नवे प्लॅन्स; डेटा-कॉलिंगसह मिळणार मोफत Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 6:54 PM

Reliance Jio, Airtel, Vodafone Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं नवनवे प्लॅन्स आणत असतात. १ सप्टेंबरपासून जिओचे नवे प्लॅन्स लागू होणार.

ठळक मुद्देReliance Jio, Airtel, Vodafone Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं नवनवे प्लॅन्स आणत असतात.१ सप्टेंबरपासून जिओचे नवे प्लॅन्स लागू होणार.

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास भेट दिली आहे. कंपनीने काही नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत, तसेच काही आधीच अस्तित्वात असलेल्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. या प्लॅन्ससह कंपनीनं ग्राहकांना Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनही दिलं आहे. कंपनीचे हे नवे प्लॅन्स 1 सप्टेंबर 2021 पासून लागू होतील. या प्लॅनची ​​किंमत 499 रुपये, 666 रुपये, 888 रुपये, 2599 रुपये आणि 549 रुपये आहे.

Disney+ Hotstar व्यतिरिक्त, जिओच्या या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. अलीकडेच  Disney+ Hotstar नं आपल्या प्लॅन्समध्ये काही बदल केले आहेत. आता कंपनीला व्हीआयपी पॅकसह पूर्ण अॅक्सेस (Disney+ originals, और Disney, Marvel, Star Wars, National Geographic, HBO, FX, Showtime, 20th Century, Searchlight Pictures चे टीव्ही शो) यांचा समावेश केला आहे. यामुळे, जिओ आपल्या जुन्या Disney+ Hotstar च्या काही प्लॅन्समध्ये हा बदल लागू करेल. तसेच कंपनीनं ग्राहकांसाठी काही नवीन पॅक आणले आहेत.

499 रूपये आणि 666 रूपयांचा प्लॅन499 रुपयांचा प्लॅन यापूर्वीपासूनच 56 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. पण 1 सप्टेंबरपासून या प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसहदेखील उपलब्ध असेल (प्लॅन दोन्ही वैधतेसह उपलब्ध असेल.). 499 रुपयांमध्ये, ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटासह मोफत व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देखील दिली जाईल. त्याचप्रमाणे 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता दिली जाईल. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस दिले जातील. यासोबत जिओ अॅप्ससह आणि 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचं संपूर्ण सबस्क्रीप्शनही घेता येते.

888 रूपये आणि 2599 रूपयांचा प्लॅन888 रुपयांच्या प्लॅन सुमारे तीन महिने चालेल. यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस मिळतील. जिओ अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह या योजनेला 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. तसंच 2599 रुपयांचा एक प्लॅन उपलब्ध आहे. हा प्लॅन आधीच उपलब्ध होता. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग, एसएमएस आणि 365 दिवसांसाठी जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही देण्यात येते. तसंच या प्लॅनसोबत डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही देण्यात येते. 

549 रूपयांचा प्लॅनहा एक डेटा अॅड ऑन पॅक आहे. यामध्ये तुम्हाला व्हाईस कॉलिंग आणि एसएमसारख्या सुविधा देण्यात येत नाही. यात ग्राहकांना ५६ दिवसांच्या वैधतेसह रोज 1.5 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच सर्व कॉन्टेन्टसह वर्षभरासाठी डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. सध्या ज्यांनी डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्यांना नवे बदल हे प्लॅन संपल्यानंतर लागू होतील.

टॅग्स :रिलायन्स जिओइंटरनेटएअरटेलव्होडाफोनआयडिया