Reliance Jio Recharge Plan: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील सुमारे ४६ कोटी मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जिओची स्वस्त सेवा. जिओनं आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लान्स आणले आहेत. यामध्ये युजर्संना स्वस्त ते महाग अशा सर्व प्रकारचे रिचार्ज प्लान्स मिळणार आहेत. याशिवाय जिओ आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा आणि ऑफर्स देखील देते, जे लोकांना खूप आकर्षित करते. अशा तऱ्हेनं जिओ ही भारतातील नंबर १ टेलिकॉम कंपनी आहे.
जर तुम्हीही जिओ युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला पूर्ण २०० दिवसांची वैधता मिळणार आहे. अशावेळी तुम्हाला पुन्हा बराच काळ रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या प्लानमध्ये युजर्संना लॉन्ग व्हॅलिडिटीसोबतच अनलिमिटेड बेनिफिट्स मिळतात.
जिओचा २०२५ रुपयांचा प्लान
जिओच्या २०२५ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २०० दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. तसंच दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात. डेटाबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ५०० जीबी डेटा म्हणजेच दररोज २.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय युजर्स या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा देखील वापरू शकतात.