Chennai Company Gift Employee: २०२४ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. काही दिवसांनी आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. परंतु हे सरतं वर्ष चेन्नईतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का देणारं ठरलंय. चेन्नईतील एका कंपनीनं ख्रिसमसनिमित्त कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू दिल्यात. सरमाउंट लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडनं आपल्या कर्मचाऱ्यांना टाटाच्या कार्स, अॅक्टिव्हा आणि रॉयल एनफिल्ड बाईक भेट म्हणून दिल्या आहेत. कंपनीच्या मालकानं कर्मचाऱ्यांची मेहनत आणि समर्पण लक्षात घेऊन ही भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या २० कर्मचाऱ्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलं होतं, त्यानंतर मालकानं त्यांना कार, बाईक आणि स्कूटी भेट दिली.
कंपनी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सामान्य आव्हानं जसं की मालवाहतुकीस विलंब, अकार्यक्षम सप्लाय चेन सोल्यूशन्स यासंदर्भातील काम करते. कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डेन्झिल रायन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू दिल्यात. "आमचं ध्येय सर्वच प्रकारच्या व्यवसायांसाठी लॉजिस्टिक्स सुलभ करणं आहे. आमचे ध्येय केवळ कार्यक्षमच नाही तर पर्यावरणाबद्दल जागरूक असलेले उपाय प्रदान करणं आहे," असंही ते म्हणाले.
काय म्हटलं मालकानं?
कर्मऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागड्या भेटवस्तूंबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय उत्पादकता आणि कंपनीशी संलग्नताही वाढते. कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करणं अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले.