नवी दिल्ली - ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मर्ज झाल्या आहेत. त्यामुळे या दोन बँकांचं जुनं चेकबुक आणि MICR कोड हे एक ऑक्टोबरपासून आता इनवॅलिड ठरणार आहे. बँका मर्ज झाल्यानंतर आता ग्राहकांना नवं चेकबुक घ्यावं लागेल. ग्राहक 1 ऑक्टोबरनंतर जुन्या चेकबुकचा वापर करू शकणार नाहीत. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या बँकांना PNB बँकेचं चेकबुक घ्यावं लागेल.
PNB ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांच्या चेकबुकला 1 ऑक्टोबरपासून मान्यता नसणार आहे. त्यामुळे IFSC आणि MICR द्वारे ग्राहकांनी चेकबुक बदलून PNB चं चेकबुक घ्यावं. बँकेने या बदलाची माहिती ग्राहकांना SMS द्वारेही दिली आहे. ग्राहक नव्या चेकबुकसाठी ATM, इंटरनेट बँकिंग आणि PNB कॉल सेंटरद्वारे अर्ज करू शकतात. ग्राहक जवळच्या ब्राँच किंवा PNB ONE App वरुनही चेकबुकसाठी अप्लाय करू शकतात. तसंच PNB टोल फ्री नंबर 1800-180-2222 वर कॉल करुन नव्या चेकबुकसंबंधी समस्यांचं निराकरण करू शकतात.
भारीच! आता हव्या तेवढ्या वेळा पैसे काढा; 'या' बँकेने दिली मोफत अनलिमिटेड ATM व्यवहारांची सुविधा
एटीएम ट्रान्झेक्शनसाठी बँकेचे काही नियम आहेत. सर्वसामान्यपणे बँकेकडून 3 पेक्षा अधिकचे एटीएम ट्रान्झेक्शन केल्यास त्यावर शुल्क लावले जाते. मात्र, एक अशीही बँक आहे जी आपल्या ग्राहकांना अमर्याद मोफत एटीएम ट्रान्झेक्शनची सुविधा देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) असं या बँकेचं नाव आहे. या बँकेने वर्ल्ड सीनियर सिटीजन डेच्या दिवशी या सुविधेची घोषणा केली. ग्राहक बँक ब्रँच आणि एटीएम दोन्हीमधून अनलिमिटेड मोफत व्यवहार करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बँकेच्या या घोषणेनंतर ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बँकेने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटला रिप्लाय करत अनेक ग्राहकांनी बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. तसेच डिजिटल बँकिंग सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.