नवी दिल्ली : चीनची हँडसेट बनविणारी कंपनी शियोमी यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात फोर जी उपकरणे विकणारी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. शियोमीने जागतिक स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आणि अॅपललाही मागे टाकले आहे. सायबर रिसर्च मीडियाने हे वृत्त दिले.
आयफोन निर्माती कंपनी शियोमी आॅक्टोबर-डिसेंबर २०१४ दरम्यान देशाची फोर जी एलटीई उपकरणे विकणारी सगळ्यात मोठी कंपनी बनल्याचे सायबर मीडियाने म्हटले होते. फोर जी एलटीई उपकरण बाजारात शियोमीचा वाटा ३०.८ टक्के होता व त्यामुळेच ती पहिल्या स्थानावर होती. यानंतर अॅपल २३.८, सॅमसंग १२.१, एचटीसी १० आणि मायक्रोमॅक्सचा वाटा ८.३ टक्के होता.
शियोमीने दिला सँमसंगला शह
चीनची हँडसेट बनविणारी कंपनी शियोमी यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात फोर जी उपकरणे विकणारी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
By admin | Published: March 18, 2015 12:02 AM2015-03-18T00:02:54+5:302015-03-18T00:02:54+5:30