मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी हे रिझर्व्ह बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असत, विशेषत: व्याजदराबाबत ते रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकायचे, असा आरोप रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केला
आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले होते की, त्यातून सरकारने आपल्या दोन कनिष्ठ सहकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली होती, असेही सुब्बाराव यांनी म्हटले आहे.
सुब्बाराव हे ५ सप्टेंबर २00८ ते ४ सप्टेंबर २0१३ या पाच वर्षांच्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. या काळात जागतिक अर्थव्यवस्था संकटात होती. या काळातील आपल्या आठवणी सुब्बाराव यांनी ‘हू मुव्ह्ड माय इंटरेस्ट रेट्स’ या पुस्तकात लिहिल्या आहेत. ३५२ पानांचे हे पुस्तक शुक्रवारी बाजारात आले. सरकारसोबतच्या संघर्षाच्या अनेक आठवणी सुब्बाराव यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.
सुब्बाराव यांनी लिहिले की, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदराबाबत कठोर धोरण स्वीकारले होते. मात्र, हे धोरण सरकारला मान्य नव्हते. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचा विकास खुंटला, असे अर्थमंत्री या नात्याने चिदंबरम आणि मुखर्जी यांचे म्हणणे होते. व्याजदर कमी करण्यासाठी त्यांचा आपल्यावर सतत दबाव असायचा. इतकेच नव्हे, तर त्यांच्यासोबतचे या मुद्यावरील मतभेद आपणास महागात पडले.
चिदंबरम, मुखर्जीकडून हस्तक्षेप होत असे!
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी हे रिझर्व्ह बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असत, विशेषत: व्याजदराबाबत ते रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकायचे
By admin | Published: July 16, 2016 02:57 AM2016-07-16T02:57:01+5:302016-07-16T02:57:01+5:30