Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीन-१, अमेरिका-२, भारत-३... कोणती आहे ही लिस्ट, ज्यात जापान आणि जर्मनीपेक्षाही पुढे आहे भारत

चीन-१, अमेरिका-२, भारत-३... कोणती आहे ही लिस्ट, ज्यात जापान आणि जर्मनीपेक्षाही पुढे आहे भारत

पाहा कोणती आहे ही यादी. कोणत्या यादीत भारतानं जर्मनी आणि जापानला टाकलंय मागे, जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:42 IST2025-01-10T12:40:58+5:302025-01-10T12:42:03+5:30

पाहा कोणती आहे ही यादी. कोणत्या यादीत भारतानं जर्मनी आणि जापानला टाकलंय मागे, जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

China 1 America 2 India3 What is this list in which India is ahead of Japan and Germany ppp economy | चीन-१, अमेरिका-२, भारत-३... कोणती आहे ही लिस्ट, ज्यात जापान आणि जर्मनीपेक्षाही पुढे आहे भारत

चीन-१, अमेरिका-२, भारत-३... कोणती आहे ही लिस्ट, ज्यात जापान आणि जर्मनीपेक्षाही पुढे आहे भारत

नॉमिनल जीडीपीच्या बाबतीत अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, त्याखालोखाल चीन, जर्मनी तिसऱ्या, जपान चौथ्या आणि भारत पाचव्या क्रमांकावर आहे. पण पीपीपी तत्त्वावर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचा १९.२९ टक्के वाटा आहे. अमेरिका १४.८४ टक्क्यांसह दुसऱ्या आणि भारत ८.४९ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत रशियाचा वाटा ३.४९ टक्के, जपानचा ३.३१ टक्के, जर्मनीचा ३.०२ टक्के आणि इंडोनेशियाचा २.४४ टक्के आहे. ब्राझील (२.३९ टक्के), फ्रान्स (२.१९ टक्के) आणि ब्रिटन (२.१६ टक्के) नवव्या क्रमांकावर आहेत.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

त्याखालोखाल इटली, तुर्कस्तान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, कॅनडा, इजिप्त आणि सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. पीपीपी तत्त्वावर जागतिक अर्थव्यवस्थेत या देशांचा वाटा १ टक्क्यांहून अधिक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) आकडेवारीनुसार पोलंड, ऑस्ट्रेलिया, तैवान, थायलंड, बांगलादेश, इराण, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि नायजेरिया या देशांमध्ये एक टक्क्यांपेक्षा ही कमी वाटा आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार २०२९ पर्यंत चीनचा वाटा १९.६४ टक्क्यांपर्यंत वाढेल, तर अमेरिकेचा वाटा १४.२६ टक्क्यांपर्यंत घसरेल. त्याचप्रमाणे भारताचा वाटा वाढून ९.६६ टक्के होण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध चीन

१९८० मध्ये पीपीपी तत्त्वावर जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा २१.५८ टक्के होता, तर चीनचा वाटा २.०५ टक्के होता. त्यावेळी भारताचा वाटा २.७७ टक्के होता. म्हणजे भारत तेव्हा चीनपेक्षा खूप पुढे होता. पण त्यानंतर चीननं आणखी उंच झेप घेतली. १९९० मध्ये भारताचा वाटा ३.४७ टक्के होता, तर चीनचा वाटा ३.६३ टक्के होता. २००० मध्ये चीनचा वाटा ६.५५ टक्क्यांवर पोहोचला होता, तर भारताचा वाटा ४ टक्क्यांवर पोहोचला होता. २०१० मध्ये चीनचा वाटा १२.५५ टक्के होता, तर भारताचा वाटा ५.३९ टक्के होता. २०२० पर्यंत चीनने अमेरिकेला मागे टाकलं आणि त्याचा वाटा १८.३६ वर पोहोचला. अमेरिकेचा वाटा १५.३५ टक्क्यांपर्यंत घसरला.

Web Title: China 1 America 2 India3 What is this list in which India is ahead of Japan and Germany ppp economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.