बीजिंग : अमेरिकेने चीनवर केलेल्या ‘हिंस्र आर्थिक धोरणा’च्या आरोपाला चीनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने संपूर्ण व्यापार युद्धाचा भडका उडवून दिला असून चिनी मालावर २00 अब्ज डॉलरचे दंडात्मक कर लावण्यासाठी ट्रम्प प्रशासन ब्लॅकमेलिंग तंत्राचा वापर करीत आहे, असे चीनने म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेव यांनी चीनवर हिंस्र आर्थिक धोरणाचा आरोप लावला होता. पॉम्पेव यांनी सांगितले होते की, चिनी नेते गेल्या काही आठवड्यांपासून खुलेपणा आणि जागतिकीकरणाची भाषा बोलत आहेत, पण हा क्रूर विनोद आहे. हे हिंस्र आर्थिक सरकार आहे. ते उरलेल्या जगाविरुद्ध काम करते. त्यावर फार पूर्वीच उपाय करायला हवा होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आता यावर समतोलाची कारवाई करीत आहेत. (वृत्तसंस्था)
अमेरिका ब्लॅकमेल करीत असल्याचा चीनचा आरोप
अमेरिकेने चीनवर केलेल्या ‘हिंस्र आर्थिक धोरणा’च्या आरोपाला चीनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:41 AM2018-06-20T00:41:30+5:302018-06-20T00:41:30+5:30