Join us

अमेरिकेसोबतची चर्चा रद्द करणार चीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:26 AM

अमेरिकेसोबतच्या उच्चस्तरीय वाटाघाटी रद्द करण्याचा विचार चीनने चालविला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेसोबतच्या उच्चस्तरीय वाटाघाटी रद्द करण्याचा विचार चीनने चालविला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांविरुद्ध आणखी २०० अब्ज डॉलरचे दंडात्मक शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर चीनकडून हा निर्णय घेण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.ट्रम्प यांनी रविवारी नव्या शुल्काबाबतचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे चीनचे उपपंतप्रधान लिवू हे यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय चिनी शिष्टमंडळ याच आठवड्यात वॉशिंग्टनला जाणार आहे. त्याआधीच ट्रम्प यांनी नवे शुल्क लावण्याची घोषणा केल्याने वाटाघाटी निरर्थक असल्याचे चीनला वाटत आहे. त्यामुळे या वाटाघाटी रद्द करण्याचा विचार चीनने चालविला आहे. चीनचे शिष्टमंडळ वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्यानंतर बुधवारी व्यापारी चर्चेस सुरुवात होणे अपेक्षित आहे. हे पथक वॉशिंग्टनला जाईल. मात्र चर्चेबाबत साशंकता आहे.

टॅग्स :भारतचीनअमेरिका