बीजिंग : अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर मूल्याच्या ५,२०७ वस्तुंवरील आयात करात चीनने आणखी ५ ते १० टक्के करवाढ केली आहे. नवे कर लावताना चीनने म्हटले की, अमेरिका व्यापार क्षेत्रात दादागिरी करीत आहे.अमेरिकी प्रशासनाने चीनच्या २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर लादलेल्या कराची अंमलबजावणी सोमवारी सुरू होताच चीनने ही प्रति कारवाई केली. यामुळे अमेरिकेच्या ११० अब्ज डॉलरच्या वस्तू वाढीव कराच्या आवाक्यात आल्या आहेत. तडजोडीचा मार्ग म्हणून चीनने अमेरिकेकडून अधिकाधिक नैसर्गिक वायू खरेदी करून चीनच्या शिलकी द्विपक्षीय व्यापारात कपातीची तयारी दर्शविली. परंतु अमेरिकेने चीनचा हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावातून चीनने अंग काढून घेतल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जनरलने दिले आहे. याआधी दोन्ही देशांच्या राजदूतांत २२ आॅगस्ट रोजी शेवटची चर्चा झाली होती.
अमेरिकी वस्तुंवरील आयात कर चीनने आणखी वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:18 AM