Join us

रोगांच्या कचाट्यात चीन; भारताला संधी, ‘जीटीआरआय’चा अहवाल, क्षमतांचा लाभ उठवायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 9:59 AM

Navi Delhi: चीन हाच जगातील मोठा वस्तू निर्माता आणि पुरवठादार देश आहे. परंतु जगाचे चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी भारताने उत्पादक म्हणून पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या क्षमतांचा लाभ उठवला पाहिजे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या (जीटीआरआय) ताज्या अहवालात म्हटले आहे. 

नवी दिल्ली : चीन हाच जगातील मोठा वस्तू निर्माता आणि पुरवठादार देश आहे. परंतु जगाचे चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी भारताने उत्पादक म्हणून पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या क्षमतांचा लाभ उठवला पाहिजे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या (जीटीआरआय) ताज्या अहवालात म्हटले आहे.

भारताने जगभरात मोबाइल आणि इतर वस्तू पाठवण्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांच्या निर्मितीसाठी उचललेल्या पावलांची अहवालात स्तुती केली आहे. या अहवालानुसार चीनमधून २०१३ मध्ये एच७एन९ बर्ड फ्लू, २०१४ मध्ये एच५एन६ बर्ड फ्लू, २०१९ मध्ये कोविड-१९ आणि २०२१ मध्ये एच१०एन३ बर्ड फ्लू या विषाणूंचा जगभर प्रसार झाला. 

चीनवर भिस्तजीटीआरआयचे सहसंस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले की, भारत पुरवठा क्षमतांमध्ये वाढ करून या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याच्या स्थितीमध्ये आहे.कोरोनामुळे आलेल्या साथीत लाखोंचे बळी गेले. पुरवठा साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चीनवरील अवलंबित्व कमी करावे लागणार आहे. 

संपूर्ण जगाला फटका - जगभरातील ९० टक्के लॅपटॉपची निर्मिती एकट्या चीनमध्ये केली जाते. यासाठी लागणारी सर्व उपकरणांची निर्मितीही चीनमध्येच होते. वॉशिंग मशिन, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आदींबाबत असेच धोरण पाळले जाते.  - कोणत्याही कारणाने चीनमधील ही निर्मिती थांबली तर संपूर्ण जगाला याचा फटका बसतो, असे अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबरपासून चीनमध्ये लहान मुलांमधील श्वसनाच्या आजाराने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे.  

टॅग्स :व्यवसायभारतचीन