बीजिंग : चीन येत्या पाच वर्षांत विदेशात १ हजार अब्ज डॉलरांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय १0 हजार अब्ज डॉलरांची आयातही चीनकडून करण्यात येईल. चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांनी ही माहिती दिली. चीनकडे ३,५00 कोटी अब्ज डॉलरचे विदेशी चलन आहे. हा पैसा विदेशात गुंतविण्याचा विचार चीन सध्या करीत आहे. आर्थिक वाढ अधिक गतिमान करण्यासाठी हा निर्णय सरकार घेत आहे, असे ली यांनी म्हटले. पूर्व युरोपीय देशांच्या आर्थिक आणि व्यापार मंचाच्या परिषदेत बोलताना ली यांनी सांगितले की, चीनचा वाढीचा दर खरोखरच कमी झाला आहे. तथापि, वाढीचा आकार मात्र वाढलाच आहे. आगामी काही वर्षांत चीनचा वाढ दर ६.५ टक्के राहील. २0२0 नंतर तो उच्च उत्पन्न वर्गातील देशांच्या यादीच्या उंबरठ्यावर असेल. चीनच्या वाढीचा दर तेज राहिल्यास पूर्व युरोपीय देशांसह जगाला अधिक संधी उपलब्ध होतील. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चीनची अर्थव्यवस्था ७ टक्के वाढीवर अडकून पडलेली आहे.
चीन विदेशात १ हजार अब्ज डॉलर गुंतवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2015 11:19 PM