Join us

बॅटरी निर्मितीत दादा चीनच! पण हे वर्चस्व नेमकं कशामुळे? भारताचा नंबर कितवा?, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 8:35 AM

संपूर्ण जगाला इलेक्ट्रिक गाड्यांचे वेध लागले आहेत. या क्षेत्रात आगेकूच कायम राखण्यासाठी अमेरिका, चीनसह सर्वच देशांनी या गाड्यांना लागणाऱ्या बॅटरी उत्पादनाकडे लक्ष वळवले आहे. बॅटरी उत्पादनात दादा कोण, पाहूया...

संपूर्ण जगाला इलेक्ट्रिक गाड्यांचे वेध लागले आहेत. या क्षेत्रात आगेकूच कायम राखण्यासाठी अमेरिका, चीनसह सर्वच देशांनी या गाड्यांना लागणाऱ्या बॅटरी उत्पादनाकडे लक्ष वळवले आहे. बॅटरी उत्पादनात दादा कोण, पाहूया...

६ मोठे देश युरोपात- २०२७ पर्यंत सर्वांत मोठ्या १० बॅटरी उत्पादकांपैकी ६ देश युरोपातील असतील. - युरोपातील बॅटरी उत्पादन प्रकल्प स्थानिक आणि परदेशी कंपन्यांच्या सहकार्यातून उभारले जातील. - यात जर्मनीतील फोल्कस् वॅगन, चीनमधील सीएटीएल आणि दक्षिण कोरियाच्या एस. के. इनोव्हेशन या मोठ्या कंपन्यांचा सहभाग असेल.

चीनचे वर्चस्व कशामुळे?बॅटरी उत्पादक सर्वांत मोठ्या १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांची मुख्यालये चीनमध्ये आहेत.ई-वाहनांसाठी लागणाऱ्या धातूंच्या खाणी, वितरण व्यवस्था आणि ई-वाहनांचे उत्पादन यात चीनचे निर्विवाद वर्चस्व आहे, यामुळे चीन यात अग्रेसर आहे.

चीनचे २०२७ मध्येही वर्चस्व २०२७ मध्येही ६९ टक्के बॅटरींचे उत्पादन एकट्या चीनमध्ये केले जाईल. उत्तर अमेरिका, युरोप इथे बॅटरी उत्पादनाचे प्रमाण वेगाने वाढले, तरी या क्षेत्रात चीनची दादागिरी कायम राहील. 

५ वर्षांत ८ पटींनी वाढणार बॅटरींचे उत्पादन, बॅटरी उत्पादन क्षमता २०२२चीन     ७७% पोलंड      ६%अमेरिका     ६%हंगेरी     ३%जर्मनी     ३%स्वीडन     १%द. कोरिया     १%जपान     १%फ्रान्स     १%भारत     ०.२% इतर सर्व     १%

२०२७चीन     ६९ अमेरिका     १० जर्मनी     ६हंगेरी     २स्वीडन     २पोलंड     १स्पेन     १फ्रान्स     १मेक्सिको     १इतर     ६ 

टॅग्स :वाहन उद्योगइलेक्ट्रिक कार