चायना कंपनीचे मोबाईल म्हणजे एकेकाळी तरुणाईत क्रेझ निर्माण झाली होती. साईडस्टीक असलेला, मोठा स्क्रीन आणि साऊंड एकदम फुल्ल असा हा मोबाईल भारतात लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे अगदी कमी किंमतीत हा मोबाईल ग्राहकांन खरेदी करता येत होता. त्यामुळे, चायना कंपन्यांना भारतात चागलंच मार्केट उभारलं होतं. त्यानंतर, चायनातील ब्रँडेड कंपन्यांनाही भारतात याच माध्यमातून पाय रोवले आणि भारतीय बाजारात चायना मोबाईलची विक्री झपाट्याने वाढली. पण, कोरोनानंतर गतवर्षा चीनी स्मार्टफोनच्या मार्केट शेअरमध्ये जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
IDC रिपोर्टच्या आकड्यानुसार, गेल्या वर्षभरात Samsung आणि Apple चे मार्केट शेअर वाढले आहेत. तर, चीनी स्मार्टफोन Xiaomi, Vivo आणि Vivo चे मार्केट शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत Apple चे मार्केट शेअर २३.१ टक्के होते. जे २०२२ च्या चौथ्या तिमाहीत २४.२ टक्के शेअर होते. सॅमसंगचे मार्केट शेअर १८.८ टक्के वाढून १९.४ टक्के झाले होते. परंतु, चीनी कंपन्या, शाओमीचे मार्केट शेअर १२.२ टक्के घसरून ११ टक्के राहिले आहे. तर ओप्पोचे मार्केट शेअर ८.२ टक्के वाढून ८.४ टक्के झाले आहेत. विवोचे मार्केट शेअर ७.७ टक्के कमून होवून ७.६ टक्के बनले. अन्य स्मार्टफोनचे मार्केट शेअर २९.४ टक्के वाढून ३०.१ टक्के झाले आहेत.
कोणत्या कंपनीचे किती मार्केट शेअर
२०२२ च्या चौथ्या तिमाहीत मार्केट शेअर
Samsung - २१.६ टक्केApple - १८.८ टक्केXiaomi - १२.६ टक्केOppo - ८.६ टक्केVivo - ८.२ टक्केअन्य - ३०.१ टक्के
२०२१ च्या चौथ्या तिमाहीतील मार्केट शेअर
Samsung - २०.० टक्केApple - १७.३ टक्केXiaomi - १४.० टक्केOppo - ९.८ टक्केVivo - ९.४ टक्केअन्य - २९.३ टक्के