Join us

अमेरिकी कंपन्यांवर चीनही कारवाईच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:07 AM

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध आणखी भडकल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग हे अनेक वर्षांपासून चीनमध्ये मोठा व्यवसाय करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

बीजिंग : अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध आणखी भडकल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग हे अनेक वर्षांपासून चीनमध्ये मोठा व्यवसाय करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. अ‍ॅपल आयएनसी, वॉलमार्ट आयएनसी व जनरल मोटर्स यांसारख्या अनेक अमेरिकी कंपन्या चीनमध्ये कार्यरत असून व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत.अमेरिकेच्या नाड्या आवळण्यासाठी शि जिनपिंग यांच्याकडून या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. सीमा शुल्कातील उशीर, कर आॅडिट आणि नियामकीय छानणीत वाढ करणे इत्यादी अनेक मार्गांनी या कंपन्यांना त्रास दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.ड्यूश बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, निर्यात व अमेरिकी कंपन्यांचा चीनमधील व्यवसाय यांचा हिशेब केल्यास चीनसोबतच्या व्यापारात अमेरिकेला २0 अब्ज डॉलर्सचा जास्त लाभ होतो. अमेरिकेने चिनी वस्तूंवर आणखी कर लादल्यास चीन सर्व अमेरिकी कंपन्यांच्या देशात मुसक्या आवळण्याचा पर्याय स्वीकारेल. (वृत्तसंस्था)