Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले

चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले

आयफोन बनवणारी कंपनी अमेरिकन आहे. पण या कंपनीसाठी चीन ही मोठी बाजारपेठ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:43 PM2023-09-08T22:43:01+5:302023-09-08T22:52:19+5:30

आयफोन बनवणारी कंपनी अमेरिकन आहे. पण या कंपनीसाठी चीन ही मोठी बाजारपेठ आहे.

China's blow to America! The news of the ban came here and Apple lost 16.61 lakh crores | चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले

चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले

चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा फटका आता कंपन्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत आयफोन बनवणारी दिग्गज अमेरिकन कंपनी अॅपलला मोठा आर्थिक फटका बसला आहे. हे प्रकरण आयफोनशी संबंधित आहे. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनी सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण त्याचा परिणाम अॅपलच्या शेअर मार्केटवर दिसून येत आहे. 

एलपीजी सिलेंडरनंतर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार? जाणून घ्या कधी होऊ शकते घोषणा

चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आयफोन वापरण्यावर बंदी घातल्याची बातमी मंगळवारी समोर आली. त्यानंतर बुधवारी अॅपलचे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर गुरुवारीही समभागात ३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या दोन दिवसांच्या घसरणीमुळे Apple चे मार्केट कॅप सुमारे  १६.६१ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. शुक्रवारी शेअर सपाट व्यवहार करत आहे. म्हणजे सध्या भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपला दोन दिवसांत अॅपलच्या बरोबरीनेच फटका बसला आहे. 

दरम्यान, गुरुवारी अॅपल स्टॉक Nasdaq वर घसरला आणि  १७७.५६ डॉलरवर बंद झाला. ५ सप्टेंबर रोजी, त्याची किंमत १८९.७ डॉलर होती. सध्या Apple चे मार्केट कॅप २.८० ट्रिलियन आहे. सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आयफोन बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांना कार्यालयात आयफोन आणू नका आणि कार्यालयात अधिकृत कामासाठी आयफोन वापरू नका असे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र, ही बंदी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये लागू करण्यात आली आहे, की काही कार्यालयांनाच हा आदेश प्राप्त झाला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार त्याची व्याप्ती वाढू शकते. जर चीनमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आयफोन ठेवण्यास बंदी घातली तर त्याची विक्री सुमारे ५ टक्क्यांनी कमी होऊ शकते, जी आर्थिकदृष्ट्या एक मोठी आकडेवारी असेल. 

Web Title: China's blow to America! The news of the ban came here and Apple lost 16.61 lakh crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.