ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. १९ - चीनच्या आर्थिक विकास दराचा आकडा जाहीर झाला असून, २०१५ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर ६.९ टक्के होता. सरकारने ७ टक्के आर्थिक विकास दराचे लक्ष्य ठेवले होते. २५ वर्षात पहिल्यांदाच चीनचा विकास दर इतका खाली घसरला आहे.
२०१४ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के होता. जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या मंदावलेल्या आर्थिक विकासाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर पडसाद उमटत आहेत. अलीकडे चीनच्या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आले होते.