Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनचा वृद्धीदर सहा वर्षांच्या नीचांकावर

चीनचा वृद्धीदर सहा वर्षांच्या नीचांकावर

चीनच्या सकल देशी उत्पादनाचा वेग यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये खाली येऊन ६.९ टक्के झाला आहे. हा दर चीनसाठी २००९ तील आर्थिक अरिष्टानंतरचा सगळ्यात कमी आहे.

By admin | Published: October 20, 2015 03:46 AM2015-10-20T03:46:30+5:302015-10-20T03:46:30+5:30

चीनच्या सकल देशी उत्पादनाचा वेग यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये खाली येऊन ६.९ टक्के झाला आहे. हा दर चीनसाठी २००९ तील आर्थिक अरिष्टानंतरचा सगळ्यात कमी आहे.

China's growth is at a six-year low | चीनचा वृद्धीदर सहा वर्षांच्या नीचांकावर

चीनचा वृद्धीदर सहा वर्षांच्या नीचांकावर

चीनच्या सकल देशी उत्पादनाचा वेग यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये खाली येऊन ६.९ टक्के झाला आहे. हा दर चीनसाठी २००९ तील आर्थिक अरिष्टानंतरचा सगळ्यात कमी आहे. चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची असून जीडीपीतील घसरण रोखण्यासाठी त्याला अर्थव्यवस्थेला उत्तेजन देणारे धोरण राबवावे लागू शकते.
यावर्षीसाठी चीनने आर्थिक विकासाचे लक्ष्य ७ टक्के ठेवले होते. निर्यातीमध्ये सतत घट होत असल्याचे दडपण अर्थव्यवस्थेवर पडत आहे, असे चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले. यावर्षीच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये जीडीपी ४८.७८ ट्रिलियन युआनवर (७.६८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) आला. २००९ च्या पहिल्या तिमाहीनंतर प्रथमच जीडीपी ७ टक्क्यांच्या खाली आला आहे. जागतिक मंदीतील अर्थव्यवस्थेचा फटका आमच्या अर्थव्यवस्थेला बसला, असे सांख्यिकी विभागाचे प्रवक्ते शेंग लाईयुन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ होईल या अपेक्षेने ग्राहकोपयोगी वस्तू, शेअर आणि विदेशी चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाली. अनेक देशांनी आपापल्या चलनाचे अवमूल्यन केले व पर्यायाने त्याचा दाब चीनच्या आर्थिक वाढीचे जे तीन आधारस्तंभ आहेत त्यापैकी एक असलेल्या निर्यातीवर पडला, असे शेंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: China's growth is at a six-year low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.