Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनमधील मंदीने बाजारावर दाटले निराशेचे ढग

चीनमधील मंदीने बाजारावर दाटले निराशेचे ढग

चीनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे चीनच्या मध्यवर्ती बँकेने चलनाचे अवमूल्यन केल्याने भारतासह अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

By admin | Published: August 16, 2015 10:05 PM2015-08-16T22:05:10+5:302015-08-16T22:05:10+5:30

चीनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे चीनच्या मध्यवर्ती बँकेने चलनाचे अवमूल्यन केल्याने भारतासह अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

China's meltdown slows down on the market | चीनमधील मंदीने बाजारावर दाटले निराशेचे ढग

चीनमधील मंदीने बाजारावर दाटले निराशेचे ढग

चीनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे चीनच्या मध्यवर्ती बँकेने चलनाचे अवमूल्यन केल्याने भारतासह अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चिंतेमुळे शेअरबाजारावर निराशेचे ढग दाटून आले असुन निर्देशांकात घसरण झाली आहे. दुसरीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन कोणतेही कामकाज न होता संपले. त्यामुळे जीएसटी विधेयकाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई शेअरबाजारात गतसप्ताह तसा निराशेचाच राहिला. सप्ताहात चार दिवस निर्देशांक घसरला सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी मात्र निर्देशांकात थोडीशी वाढ झाल्याने आधीची घसरण भरुन निघाली. मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील निदेशांक १६९ अंशांनी खाली येऊन २८०६७.३१ अंशांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मागील सप्ताहाच्या बंदा निर्देशांकापेक्षा ४६ अंश म्हणजेच ०.५४ टक्के खाली येऊन ८५१८.५५ अंशांवर बंद झाला. सप्ताहाच्या प्रारंभी चीनने आपली घटती निर्यात लक्षात घेऊन युआन या आपल्या चलनाचे अवमूल्यन केले. यामुळे डॉलरची किंमत वाढली याचा सर्वाधिक फायदा चीनला होणार आहे. चीनने अन्य देशांशी निर्यात करार करतांना डॉलरमध्ये रक्कम मिळण्याचे कलम घातले आहे.
चलनाच्या अवमूल्यनामुळे चीनला अधिक प्रमाणात डॉलर मिळणार आहेत.

Web Title: China's meltdown slows down on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.