Join us

PUBG वाल्या चिनी कंपनीनं Flipkart मध्ये खरेदी केला मोठा हिस्सा, इतक्या कोटींना झाला सौदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:46 PM

Flipkart चं कार्यालय सिंगापूरमध्ये नोंदणीकृत असून ते फक्त भारतात कार्यरत आहे.

चिनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज टेनसेंटने वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांच्या युरोपियन उपकंपनीद्वारे २६४ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे २०६० कोटी) हिस्सा विकत घेतला आहे. हा व्यवहार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण झाला. अधिकृत दस्तऐवजांमधून ही माहिती समोर आली आहे. Flipkart सिंगापूरमध्ये नोंदणीकृत आहे आणि फक्त भारतात कार्यरत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, बिन्नी बन्सल यांनी टेनसेंट क्लाउड युरोपला स्टेक विकल्यानंतर फ्लिपकार्टमधील त्यांचा हिस्सा आता १.८४ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टच्या सुरूवातीपासूनच टेनसेंटनं यात गुंतवणूक केली असल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीकडून देण्यात आली. हा व्यवहार तेव्हा झाला जेव्हा गेल्या वर्षी सॉफ्टबँकसह अन्य गुंतवणूकदारांनी कंपनीत ३.६ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. यादरम्यान, बन्सल यांनी आपल्या काही हिस्स्याची विक्री केली. सद्या फ्लिपकार्टमध्ये टेनसेंटचा ०.७२ टक्के हिस्सा आहे.

महासाथीच्या सुरुवातीच्या काळात सरकारने एप्रिल २०२० मध्ये प्रेस-नोट ३ (२०२० सीरिज) आणली होती. महामासाथीच्याच् काळात भारतीय कंपन्यांचे संधीसाधू अधिग्रहण रोखण्यासाठी हे आणले गेले. ज्या देशांच्या सीमा भारताशी लागून आहेत अशा देशातील कंपन्यांना प्रेस-नोट ३ ची आवश्यकता आहे. यासोबतच त्यांना मंजुरी आणि सुरक्षेची मंजुरी घेणेही आवश्यक आहे.  दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेनसेंट आणि बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार टेनसेंटचा फ्लिपकार्टमध्ये हिस्सा १ टक्क्यांपेक्षाही कमी आहे आणि फ्लिपकार्टची नोंदणी सिंगापूरमध्ये झाली आह. त्यामुळे या डीलसाठी नोट ३ ची आवश्यकता नाही.

टॅग्स :फ्लिपकार्टव्यवसाय