बीजिंग : भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनने एक परिषद स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. चीनमधील हुनान प्रांतात या परिषदेचे मुख्यालय राहील. भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीन सरकारने स्थापन केलेली ही पहिली अधिकृत सरकारी संस्था ठरणार आहे.
चायना कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ इंटरनॅशनल ट्रेड (सीसीपीआयटी) ही ती संस्था स्थापन केली जाणार आहे. तिचा कार्यकाळ २ वर्षांचा राहील. हुनानमधील सीसीपीआयटीच्या उप समितीचे चेअरमन हे जियान यांनी नव्या संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, चीन-भारत व्यवसाय परिषदेची स्थापना करणे हे माझे पहिले काम आहे. हुनानची प्रांतिक राजधानी चांगशा येथील सीसीपीआयटीच्या कार्यालयातूनच नव्या संस्थेचे कामकाज चालेल. नवी दिल्ली व हैदराबाद येथेही कार्यालये असतील. भारतात होणाऱ्या चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहित करणे
तसेच समन्वय करणे ही कामे संस्था करील.
भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय व्यापार ७0,७१ अब्ज डॉलरचा आहे. २0१५ मध्ये चीनची जागतिक आयात-निर्यात २४.५९ निखर्व युआन होती. गेल्याच महिन्यात भारत-चीन वित्तीय वाटाघाटी झाल्या. त्यावेळी चीनचे वित्त उपमंत्री शी योआबीन यांनी सांगितले होते की, गेल्या वर्षीपर्यंत चीनची भारतातील गुंतवणूक ४.0७ अब्ज डॉलर होती.
भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद
भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनने एक परिषद स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. चीनमधील हुनान प्रांतात या परिषदेचे मुख्यालय राहील.
By admin | Published: September 17, 2016 05:42 AM2016-09-17T05:42:26+5:302016-09-17T05:42:26+5:30