Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनचा १.०७ ट्रिलियन डॉलरचा फुगा फुटला! ड्रॅगन मंदिच्या छायेत; जगासाठी का आहे धोक्याची घंटा

चीनचा १.०७ ट्रिलियन डॉलरचा फुगा फुटला! ड्रॅगन मंदिच्या छायेत; जगासाठी का आहे धोक्याची घंटा

China News: अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी चीनने नुकतेच मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यानंतर बाजारात काही काळ उत्साह पाहायला मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पहिले पाढे पच्चावन्न सुरू झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:20 PM2024-10-29T15:20:27+5:302024-10-29T15:21:58+5:30

China News: अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी चीनने नुकतेच मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यानंतर बाजारात काही काळ उत्साह पाहायला मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पहिले पाढे पच्चावन्न सुरू झाले आहेत.

chinas stimulus has had a muted reaction thus far | चीनचा १.०७ ट्रिलियन डॉलरचा फुगा फुटला! ड्रॅगन मंदिच्या छायेत; जगासाठी का आहे धोक्याची घंटा

चीनचा १.०७ ट्रिलियन डॉलरचा फुगा फुटला! ड्रॅगन मंदिच्या छायेत; जगासाठी का आहे धोक्याची घंटा

China News: भारताकडे नेहमी वाकड्या नजरेने पाहणाऱ्या चीनच्या भ्रमाचा भोपळा अखेर फुटला आहे. चीनने अलीकडेच आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १.०७ ट्रिलियन डॉलरचे मोठे पॅकेज जाहीर केले होते. यानंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. काही परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या देशातून आपला पैसा काढून चीनच्या बाजारपेठेत गुंतवत आहेत. पण काही गुंतवणूकदारांनी या चिनी पॅकेजच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली होती. त्यांची शंका आता खरी ठरणार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत या पॅकेजचा वास्तवात काहीही परिणाम झालेला दिसत नाही. तिसऱ्या तिमाहीत देशात ग्राहकांच्या किमतीत घट झाली आहे. ही सलग सहावी तिमाही असून १९९९ नंतरच्या घसरणीचा हा सर्वात मोठा कालावधी आहे.

चीनची अर्थव्यवस्था आधीच मंदीच्या गर्तेत अडकली असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, असे मानले जात आहे. चीनमध्ये चलनवाढीची स्थिती कायम आहे. २००८ मध्ये देशात सलग ५ तिमाही चलनवाढीची परिस्थिती होती. मात्र, यावेळी ती त्याहूनही पुढे गेली आहे. संपूर्ण जग महागाईने त्रस्त आहे. पण चीनमध्ये गंगा उलटी वाहत आहे. चलनवाढ महागाईपेक्षा वाईट मानली जाते. यामध्ये वस्तूंच्या किमती घसरतात.

अर्थव्यवस्था अडचणीत?
चलनवाढ हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण मानले जात नाही. उद्या वस्तूंची किंमत कमी होणार आहे, हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आज का खरेदी कराल? अशा प्रकारे अर्थव्यवस्था गोठते. १९९० च्या दशकात जपानच्या बाबतीत असेच घडले होते. आजही जपान त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकलेला नाही. चीनची अर्थव्यवस्था अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. बेरोजगारी अनेक दशकांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. उत्पादन घसरत असून रिअल इस्टेट क्षेत्र संघर्ष करत आहे. ग्राहकांची मागणी घटल्याने चिनी ग्राहक देश मंदीत असल्यासारखे वागत आहेत.

जगासाठी धोक्याची घंटा
गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि चीनमधील संबंध चांगले चाललेले नाहीत. दोन्ही देश एकमेकांच्या कंपन्यांवर कारवाई करण्यात व्यस्त आहेत. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील शुल्कात वाढ केली असून ती पुढील टप्प्यात लागू केली जाणार आहे. चीनमधील मंदीमुळे संपूर्ण जग प्रभावित होणार आहे. याचे कारण चीन गेल्या तीन दशकांपासून जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. त्यामुळेच चीनमध्ये मंदीची शक्यता ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.
 

Web Title: chinas stimulus has had a muted reaction thus far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.