बीजिंग : सरकारने उपाययोजना केल्यानंतरही चीनचा शेअर बाजार बुधवारी आपटला. अलीकडील कालावधीत गुंतवणूकदारांचे तब्बल ३ हजार अब्ज डॉलर बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वासच उडाला आहे. आणखी नुकसान होऊ नये यासाठी गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडत आहेत.
चीनचा प्रमुख शेअर बाजार निर्देशांक शांघाय कम्पोजिट ५.९ टक्क्यांनी घसरून ३,५0७.१९ अंकांवर आला. शेनझेन कंपोनेंट निर्देशांक २.९४ टक्क्यांनी घसरून ११,0४0.८९ अंकांवर आला. शांघाय शेअर बाजारातील ६९0 कंपन्यांचे समभाग घसरले. फक्त १२ कंपन्यांचे समभाग वाढले. शेनझेन शेअर बाजारातील ६0९ कंपन्यांचे समभाग घसरले असेच १४९ कंपन्यांचे समभाग वाढले.
दोन्ही बाजारांत मिळून १ हजारपेक्षा जास्त कंपन्यांचे समभाग एकाच दिवसात १0 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. चीनची सरकारी वृत्तसंस्था झिन्हुआने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आणखी नुकसान टाळण्यासाठी शांघाय आणि शेनझेन येथील बाजारांतील २,८00 पेक्षा जास्त कंपन्यांचा शेअर व्यवहार रोखण्यात आला आहे.
का आपटले चीनमधील शेअर बाजार ?
सरकारने उपाययोजना केल्यानंतरही चीनचा शेअर बाजार बुधवारी आपटला. अलीकडील कालावधीत गुंतवणूकदारांचे तब्बल ३ हजार अब्ज डॉलर बुडाले आहेत
By admin | Published: July 8, 2015 11:32 PM2015-07-08T23:32:12+5:302015-07-08T23:32:12+5:30