Join us

चिनी कंपनीने भारतात विकले १0 लाख स्मार्टफोन

By admin | Published: October 21, 2016 1:57 AM

चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी शिओमीने भारतात अवघ्या १८ दिवसांत विक्रमी १0 लाख हँडसेट विकले आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात

बीजिंग : चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी शिओमीने भारतात अवघ्या १८ दिवसांत विक्रमी १0 लाख हँडसेट विकले आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात असतानाही, शिओमीने ही कामगिरी केल्याचे वृत्त चीनमधील सरकारी माध्यमांनी दिले आहे.शिओमीचे संस्थापक तथा सीईओ ली जून यांनी सांगितले की, भारतातील सर्वांत मोठा स्मार्टफोन विक्रेता बनण्याचे उद्दिष्ट शिओमीने ठेवले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारा बाजार आहे. त्याचा लाभ कंपनी उठविणार आहे. ली जून यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले की, या आॅक्टोबरच्या पहिल्या १८ दिवसांत कंपनीने भारतात १0 लाख स्मार्टफोन विकले. चीननंतर भारतच आपला मोठा बाजार आहे. शिओमीची प्रतिस्पर्धी कंपनी हुवेई टेक्नॉलॉजीने भारतात स्मार्टफोन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिओमीने भारतातील आपल्या विक्रीची घोडदौड जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)मोठी बाजारपेठ भारतचशिओमीचे सीईओ ली यांनी सांगितले की, भारतातील दिवाळीच्या हंगामाचा लाभ कंपनीला मिळाला आहे. त्याआधी सप्टेंबरमध्ये शिओमी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन विक्रेती कंपनी बनली होती. कंपनी भारतातील प्रमुख ३0 शहरांत स्मार्टफोन विकते. कंपनीचा भारतातील एकूण स्मार्टफोन विक्रीतील हिस्सा ८.४ टक्के आहे. ही माहिती ली यांनी दिली.