नवी दिल्ली - चीनमधून छत्र्या, खेळणी, काही कपडे आणि संगीत वाद्ये यांची आयात केल्यामुळे देशातील छोट्या व मध्यम व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ने (जीटीआरआय) जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, छत्र्या, खेळणी, कपडे आणि संगीत वाद्यांची देशात मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. छोटे व मध्यम व्यावसायिक या उद्योगात आहे. चीनमधून स्वस्त आयात होत असल्यामुळे त्यांना फटका बसत आहे. यातील सर्वाधिक आयात चीनमधून झाली आहे.
८.५ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात जानेवारी २०२४ ते जून २०२४ या कालावधीत भारतातून केवळ झाली.
५०.४ अब्ज डॉलरची आयात याच कालावधीत झाली.
४१.९ अब्ज डॉलर इतकी भारताची व्यापारी तूट राहिली.
२९.७ टक्के औद्योगिक साहित्याच्या आयातीत चीनचा होता.