Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात येणार चिनी औद्योगिक पार्क

भारतात येणार चिनी औद्योगिक पार्क

भारतात चिनी औद्योगिक पार्क उघडण्यास मंजुरी देणा:या महत्त्वपूर्ण करारावर आज भारत आणि चीनने स्वाक्ष:या केल्या.

By admin | Published: June 30, 2014 10:41 PM2014-06-30T22:41:28+5:302014-06-30T22:41:28+5:30

भारतात चिनी औद्योगिक पार्क उघडण्यास मंजुरी देणा:या महत्त्वपूर्ण करारावर आज भारत आणि चीनने स्वाक्ष:या केल्या.

Chinese industrial park will come to India | भारतात येणार चिनी औद्योगिक पार्क

भारतात येणार चिनी औद्योगिक पार्क

>बीजिंग : भारतात चिनी औद्योगिक पार्क उघडण्यास मंजुरी देणा:या महत्त्वपूर्ण करारावर आज भारत आणि चीनने स्वाक्ष:या केल्या. भारतात रालोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या वाणिज्यमंत्र्यांची पहिली बैठक आज येथे पार पडली. या बैठकीत हा करार करण्यात आला.
भारताच्या वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी चीनचे वाणिज्यमंत्री गाओ हुचेंग यांच्याशी वाटाघाटी केल्या. त्याआधी काल निर्मला यांनी येथे मीडियाशी बातचीत केली होती. व्यापारी तुटीविषयक भारताच्या चिंता आपण चिनी नेत्यांसमोर मांडू, असे निर्मला यांनी म्हटले होते. त्याचबरोबर भारतीय वस्तूंना चिनी बाजारात जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, याबाबतही आपण चर्चा करू, असे निर्मला म्हणाल्या होत्या.
उपराष्ट्रपती हमीद अंसारी आणि वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण हे काल बीजिंगला पोहोचले. 
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, चीनसोबतचा भारताचा व्यापार तोटय़ात आहे. भारताला तब्बल 35 अब्ज डॉलरची व्यापारी तूट त्यातून सहन करावी लागत आहे. यंदा चीनमधून होणारी भारताची आयात वाढल्याने ही तूट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांतील व्यापार 65.47 अब्ज डॉलरच्या बरोबरीत होता. 
दोन्ही देशांच्या वाणिज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर औद्योगिक पार्कच्या सहकार्य करारावर दोन्ही बाजूंनी स्वाक्ष:या करण्यात आल्या. या करारान्वये चिनी कंपन्या भारतात 4 औद्योगिक पार्क स्थापन करतील. त्यातून चीनची भारतातील गुंतवणूक वाढेल. त्यातून भारताच्या व्यापारी तुटीवर नियंत्रण मिळविण्यास मदत मिळेल. चीनचे हे औद्योगिक पार्क भारताच्या चार वेगवेगळ्या राज्यांत उभे राहावेत, असा भारताचा प्रयत्न आहे, असे उच्चस्तरीय सूत्रंनी नंतर
सांगितले.
निर्मला यांनी बैठकीआधी सांगितले की, भारतातील रत्ने, दागिने, विना ब्लीचचे कपडे, औषधी आणि आयटी उत्पादने यांना चीनमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मी चिनी मंत्र्याकडे करणार आहे. सध्या चीनसोबतच्या व्यापारात आम्ही निर्यातीच्या तुलनेत आयात जास्त करीत आहोत. हा प्रश्न सोडविण्यासाठी चिनी कंपन्यांनी भारतात येऊन गुंतवणूक करावी, अशी आमची सूचना आहे.
(वृत्तसंस्था)
 
4भारतीय आयटी कंपन्या तसेच औषधी कंपन्यांसाठी चीनने आपली बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी भारताकडून केली जात आहे. त्याचप्रमाणो व्यापारी तूट कमी करण्यासाठी चीनकडून भारतात गुंतवणूक करावी, अशी मागणी केली जात आहे.
 
4चिनी अधिका:यांनी सांगितले की, सध्या चीनची भारतातील गुंतवणूक 1.1 अब्ज डॉलर एवढी आहे. यातील बहुतांश गुंतवणूक गुजरातमध्येच केंद्रित झालेली आहे. 

Web Title: Chinese industrial park will come to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.