Join us  

चीनचा डोलारा कोसळू लागला! सर्वात मोठी एव्हरग्रँड रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोरीत, ड्रॅगन अखेरचा श्वास घेतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:58 AM

चीनमध्ये रिअल इस्टेटचे संकट गडद झाले आहे. Evergrande, चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आणि तिच्या उपकंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.

गेल्या काही दिवसापासून चीन आर्थिक संकटातून जात आहे. चीनची दिग्गज रिअल इस्टेट कंपनी चीन एव्हरग्रेन्डने अमेरिकेच्या न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. एव्हरग्रेन्ड ही जगातील सर्वात जास्त कर्ज असलेली कंपनी आहे. या कंपनीवर 330 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. एकेकाळी चीनमधील दोन नंबरची रिअल इस्टेट कंनी होती. २०२१ मध्ये या कंपनीला डिफॉल्ट घोषीत केले होते. 

FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष

चीनमध्ये रिअल इस्टेट गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात सापडले आहेत, एव्हरग्रेन्ड कंपनीची सहयोगी कंपनी तियानजी होल्डिंग्सनेही दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. कंपनीने अमेरिकेच्या बँकेरप्सी कोडच्या १५ सह संरक्षण मागितले आहे. यामुळे या कंपनीच्या विरोधात आपण खटला भरु शकत नाही.  

चीनमध्ये २०२१ मध्येच रिअल इस्टेट क्षेत्रात संकट सुरू झाले होते. चीनची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी डिफॉल्ट जाहीर झाली आहे. देशात सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये या कंपन्यांची ४० टक्के गुंतवणूक आहे. याचा  प्रभाव अनेक क्षेत्रांवर पडू शकतो, कंपनीने आता या महिन्याच्या व्याजासाठी डिफॉल्ड केले आहे. यामुळे आता गुंतवणूकदारांध्ये गोंधळ सुरू झाला आहे. या संकटामुळे आता देशातील अनेक मोठे प्रोजेक्टची कामे थांबली आहेत. 

एव्हरग्रेन्ड कंपनीला २०२१-२२ मध्ये कंपनीचे ८१ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. कंपनीने मार्चमध्ये कर्ज पुनर्गठन योजना दिली होती, मात्र त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोमवारी, त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन युनिट चायना एव्हरग्रेन्ड न्यू एनर्जी व्हेईकल ग्रुपने देखील पुनर्रचना प्रस्तावित केली. मार्च २०२२ पासून चायना एव्हरग्रेंडच्या शेअर्सचे ट्रेडिंग निलंबित करण्यात आले आहे.

एव्हरग्रेन्ड या कंपनीची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली आहे. या कंपनीचे संस्थापक जू जियाइन हे २०१७ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. रिअल इस्टेटमधील यशानंतर कंपनीने इलेक्ट्रिक वाहने, आरोग्य दवाखाने, मिनरल वॉटर आणि इतर अनेक व्यवसायात प्रवेश केला. 

टॅग्स :चीनबँकअमेरिका