सीमेवर कुरापती काढणाऱ्या चीनची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकारने आता चिनी बनावटीच्या स्मार्टफोन्सकडे वक्रदृष्टी वळवली आहे. चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना केंद्र सरकारने नोटिसा धाडल्या आहेत. गेल्या वर्षी भारताने २६९ चिनी ॲप्सवर बंदी घातली होती.
नोटिसीत काय?
विवो, ऑपो, शाओमी आणि वन प्लस या स्मार्टफोनची निर्मिती व विक्री करणाऱ्या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
कंपन्यांनी स्मार्टफोन्सची निर्मिती करताना कोणते घटक वापरले त्याचा डेटा काय, याचा तपशील देण्याचे नोटिसीत म्हटले आहे.
या स्मार्टफोन्समध्ये वापरलेले घटक आणि डेटा भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने सुरक्षित आहेत किंवा कसे, हे तपासण्यासाठी या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नोटीस पाठवण्याचे कारण?
चीन सातत्याने सीमारेषेवर भारताच्या कुरापती काढत आहे.
चीनला लष्करी ताकदीबरोबरच वाणिज्यिक पद्धतीनेही उत्तर देण्याचा भारताचा इरादा आहे.
या पार्श्वभूमीवर चिनी स्मार्टफोन निर्मात्या आणि विक्रेत्या कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
स्मार्टफोन्सच्या विक्रीवर परिणाम होऊन चीनची काही प्रमाणात आर्थिक घुसमट करण्याचा प्रयत्न आहे.
भारतीय ग्राहकांना भुरळ
स्वस्त, आकर्षक आणि विविध फीचर्स यांमुळे विवो आणि ऑपो हे स्मार्टफोन्स भारतीयांच्या पसंतीला उतरले आहेत.
शाओमी आणि वन प्लस या स्मार्टफोन्सनेही ग्राहकांना भुरळ घातली आहे.
इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत विवो, ऑपो, शाओमी आणि वन प्लस या स्मार्टफोन्सची विक्री भारतीय बाजारपेठेत जोमात आहे.
भारतात प्रसिद्ध असलेले चिनी स्मार्टफोन्स
विवो, ऑपो, शाओमी, वन प्लस
चिनी ॲप्सवर बंदी
गेल्या वर्षी भारताने २६९ चिनी ॲप्सवर बंदी घातली होती.
त्यात टिकटॉक, शेअरइट, बाइटडान्स, पब्जी यांसारख्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय ॲप्सचा समावेश होता.
चिनी स्मार्टफोन्सवर गंडांतर येण्याची शक्यता; सरकारनं पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय?
चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना केंद्र सरकारने नोटिसा धाडल्या आहेत. गेल्या वर्षी भारताने २६९ चिनी ॲप्सवर बंदी घातली होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:05 AM2021-10-20T06:05:16+5:302021-10-20T06:06:00+5:30