नवी दिल्ली : रेल्वेच्या एसी डब्यातील प्रवाशांपेक्षा विमान प्रवाशांची संख्या अधिक असल्याचा दावा केंद्र सरकारने केला. ‘उडान’ योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक विमान प्रवास करू शकत असल्याचे केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने ‘साफ नियत, सही विकास’ नावाचा अहवाल प्रकाशित केला. देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, तो आकडा रेल्वेच्या एसी डब्याने प्रवास करणाऱ्यांपेक्षाही अधिक असल्याचा दावा, या अहवालात केला आहे, परंतु रेल्वेच्या एसी डब्याने नेमक्या किती प्रवाशांनी मागील वर्षी प्रवास केला, हा आकडा सरकारने दिलेला नाही, पण सध्या देशांतर्गत हवाई क्षेत्र १८ ते २० टक्क्यांनी वाढत आहे. यामुळेच २०१७ मध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या १० कोटींवर पोहोचली. ‘उडान’ योजनेमुळे देशातील कार्यरत विमानतळांची संख्या १००च्या वर गेली. पुढील काही वर्षांत देशातील विमानांची संख्या ५५० वरून १००० वर जाईल, तसेच वार्षिक प्रवाशांची संख्या पुढील १५ ते २० वर्षांत १०० कोटींच्या वर जाईल, असा दावा सरकारने केला आहे.
मागील वर्षभरात हवाई इंधनाच्या दरात २० टक्के वाढ झाली असतानाही, विमानांच्या तिकीट दरात १२ टक्के घट झाल्याचा दावा नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनीही अलीकडेच मुंबईत ‘लोकमत’शी बोलताना केला होता.
रेल्वेच्या ‘एसी’ कोचपेक्षा विमान प्रवासाला पसंती
रेल्वेच्या एसी डब्यातील प्रवाशांपेक्षा विमान प्रवाशांची संख्या अधिक असल्याचा दावा केंद्र सरकारने केला. ‘उडान’ योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक विमान प्रवास करू शकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:30 AM2018-05-30T05:30:08+5:302018-05-30T05:30:08+5:30