शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सनी तर त्यांच्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात कोट्यधीश अर्थात करोडपती बनवले आहे. याशिवाय, शेअर बाजारात असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी 1 रुपया पेक्षाही कमी किंमतीत आपला प्रवास सुरू केला आणि आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला. आज आम्ही आपल्याला अशाच एका कंपनीच्या शेअर संदर्भात बोलणार आहोत.
ज्या शेअरसंदर्भात आम्ही बोलत आहोत, तो शेअर आहे City Union बँकेचा. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मोठा परतावा दिला आहे. एके काळी या शेअरची किंमत 1 रुपयांपेक्षाही कमी होती. मात्र आता हा शेअर 100 रुपयांच्याही पुढे ट्रेड करत आहे. 28 मे 1999 रोजी एनएसईवर या शेअरची किंमत 90 पैसे होती. मात्र यानंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.
शेअरमध्ये चढ-उतर -
हा शेअर 2006 मध्ये पहिल्यांदाच 10 रुपयांच्या पुढे सरकला होता. यानंतर वर्ष 2013 मध्ये तो 50 रुपयांवर पोहोचला. 2016 मध्ये या शेअरची किंमत 100 रुपयांवर गेली. 2019 मध्ये तो 200 रुपयांवर पोहोचला. यानंतर, 2020 मध्ये कोरोनापूर्वी तो 230 रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र, कोरोना काळात हा शेअर घसरला. यानंतर या शेअरमध्ये चढ उतार दिसून आला.
गुंतवणूकदार मालामाल -
एनएसईवर 14 अगस्त 2023 रोजी या शेअरचा क्लोजिंग भाव 121.60 रुपये एवढा होता. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 205 रुपये आहे. तर निचांक 119.50 रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने 1999 मध्ये हा या शेअरमध्ये एक रुपयाच्या दराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 1.21 कोटी रुपये झाले असते. अर्थात या शेअरने गेल्या 24 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 11821 टक्क्यांचा परतावा दिला आहे.