नवी दिल्ली : कुठल्याही प्लास्टिकवर फर्नेस तेलाद्वारे पुनर्प्रक्रिया करता येते, असा दावा प्लास्टिकबंदीमुळे संकटात आलेल्या व्यावसायिकांनी केला आहे. ते सरकारच्या समितीसमोर ते दाखवून देणार आहेत. त्यातून पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल.
राज्याच्या प्लास्टिकबंदीमुळे निर्मिती करणाऱ्या उद्योगांखेरीज या प्लास्टिकचा वापर करणाºया व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पॅकेजिंग, खाद्य तेल व सरबते विक्री या व्यवसायांचा समावेश आहे. या क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर संकट ओढवले आहे. पॅकेजिंग उद्योगातील मोठे व्यावसायिक महागड्या पर्यायी उत्पादनांसह स्वत:चा व्यवसाय चालवत आहेत. पण छोट्या व्यावसायिकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्टÑ चेम्बर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर, महाराष्टÑ खाद्य तेल व्यापारी असोसिएशनसह जवळपास दहा संघटनांच्या पदाधिकाºयांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली.
चेम्बरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले की, बंदी असलेल्या बहुतांश प्लास्टिकची ‘लो ड्रॉपआऊट व्होल्टेज’ (एलडीओ) या आग तयार करणाºया तंत्रज्ञानाद्वारे अथवा फर्नेस तेलाला विशिष्ट श्रेणीत गरम करण्याच्या माध्यमातून पुनर्प्रक्रिया शक्य असते. त्यामुळे सरकारने सरसकट बंदी उठवावी.
फर्नेस तेलात प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियेचा केला दावा
कुठल्याही प्लास्टिकवर फर्नेस तेलाद्वारे पुनर्प्रक्रिया करता येते, असा दावा प्लास्टिकबंदीमुळे संकटात आलेल्या व्यावसायिकांनी केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:16 AM2018-06-28T05:16:48+5:302018-06-28T05:17:30+5:30