गेल्या महिन्यात, हाँगकाँग आणि सिंगापूरने उठवलेल्या गुणवत्तेची चिंता लक्षात घेऊन, FSSAI ने देशभरातून MDH आणि एव्हरेस्टसह सर्व ब्रँडच्या मसाल्यांचे नमुने घेणे सुरू केले होते. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. फूड रेग्युलेटर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ला एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन आघाडीच्या ब्रँडच्या मसाल्यांच्या नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचा कोणताही अंश आढळलेला नाही. २८ मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासण्यात आले. मात्र, इतर सहा प्रयोगशाळांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
एप्रिल महिन्यात, हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टीने ग्राहकांना MDH चे मद्रास करी पावडर, एव्हरेस्ट फिश करी मसाला, MDH सांबार मिक्स मसाला पावडर आणि खरेदी न करण्याचा सल्ला दिला होता. एमडीएच करी पावडर मिक्स मसाला पावडर खरेदी करू नका आणि विक्री करू नका असे सांगितले होते. CFS ने म्हटले होते की, दोन भारतीय ब्रँड्सच्या विविध प्री-पॅकेज केलेल्या मसाला-मिक्स उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड आढळून आले. यानंतर सिंगापूर फूड एजन्सीनेही असे मसाले परत मागवण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर अलीकडे नेपाळनेही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांवर निर्बंध लादले आहेत.
भारतातील सरकारने मसाल्यांच्या बाबतीत कडक पाऊलं उचलली आहेत. सरकारने मसाल्यांच्या नमुन्यांची स्थानिक पातळीवर चाचणीच केली नाही तर निर्यात केलेल्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड दूषित होण्यापासून रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली. सिंगापूर आणि हाँगकाँगला निर्यात होणाऱ्या मसाल्यांच्या अनिवार्य चाचणीसारख्या इतर उपाययोजनाही सरकारने केल्या आहेत.
२०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ३.७ बिलियनच्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताची मसाल्यांची निर्यात एकूण ४.२५ अब्ज डॉलर होती. जागतिक मसाला निर्यातीत भारताचा वाटा १२ टक्के आहे.