नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी घोषणा केलेल्या स्वच्छ भारत या उपकराची अंमलबजावणी येत्या १५ नोव्हेंबरपासून करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्त मंत्रालयाने केली आहे. सेवाकराच्या १४ टक्के या दरावर हा अर्धा टक्क कर आकारला जाणार असल्याने सेवा कराअंतर्गत येणाऱ्या सर्वच घटकांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. परिणामी, शॉपिंग, हॉटेलिंग, विमान प्रवास इत्यादींच्या किमतीत वाढ होईल. यामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षात ४०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल.अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी देशात स्वच्छता राखण्यासाठी निधी उभारणीच्या दृष्टीने ०.५ टक्के उपकराची घोषणा केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)अर्धा टक्का नवा उपकर लागूज्या ज्या गोष्टींवर सेवाकर आकारला जातो, त्या प्रत्येक सेवेवर प्रति १०० रुपये ५० पैसे या दराने हा उपकर लागू होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सेवाकराच्या माध्यमातून सरकारला दोन लाख नऊ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. सध्या काही घटक वगळता सर्वच वस्तू आणि सेवांवर सेवाकर लागू होतो. परिणामी सर्वच घटकांवर हा नवा उपकर लागू होणार आहे.
१५ नोव्हेंबरपासून स्वच्छ भारत उपकर
By admin | Published: November 07, 2015 3:56 AM