Join us

केमिकल उद्योगात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा IPO खुला, अर्जासाठी केवळ २ दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 9:15 PM

IPO: केमिकल उद्योगामध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी असून, या क्षेत्रात मोठे नाव असलेल्या एका कंपनीचा IPO खुला झाला आहे.

ठळक मुद्देकेमिकल उद्योगात गुंतवणुकीची संधीक्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेडचा IPO खुलाएका शेअरची किंमत किती?

मुंबई:शेअर बाजारात तेजी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५३ हजार अंकांचा नवा उच्चांक गाठला असून, निफ्टीचीही उच्चांकी घोडदौड सुरू आहे. यातच नवनवे IPO शेअर बाजारात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांना उत्तमोत्तम संधी प्राप्त होत आहेत. केमिकल उद्योगामध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी असून, या क्षेत्रात मोठे नाव असलेल्या एका कंपनीचा IPO खुला झाला आहे. (clean science and technology IPO open and know everything about it)

स्पेश्यालिटी केमिकल्स उत्पादित करणारी कंपनी क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेड या कंपनीचा IPO ७ जुलै २०२१ रोजी खुला झाला आहे. या योजनेत ९ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे. परफॉर्मन्स केमिकल्स, फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्स आणि एफएमसीजी कंपन्यांना लागणारी केमिकल्स अशा कार्यशीलतेच्या दृष्टीने महत्त्वाची स्पेश्यालिटी केमिकल्स उत्पादित करण्याचे काम सदर कंपनी करते. 

अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

एका शेअरची किंमत किती?

या कंपनीच्या प्रती इक्विटी शेअरची किंमत ८८० ते ९०० या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. किमान १६ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर १६ च्या पटीतील संख्येइतक्या इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. या योजनेत ९ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे. या IPO मधून १५,४६६.२२ दशलक्ष रुपयांपर्यंतच्या रकमेच्या समभागांची विक्री करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, या ऑफरमधील ५० टक्‍क्‍यांहून अधिक भाग समानुपाती पद्धतीने क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स कडे गुंतवला जाणार नाहीत. यात अशोक रामनारायण बूब यांच्याजवळील २,४४०.१६ दशलक्ष रुपयांपर्यंत एकूण मूल्य असलेले शेअर्स, कृष्णकुमार रामनारायण बूब यांच्याजवळील १,९३०.५९ दशलक्ष रुपयांपर्यंत एकूण मूल्य असलेले शेअर्स, सिद्धार्थ अशोक सिकची यांच्याजवळील ४०५.०५ दशलक्ष रुपयांपर्यंतचे एकूण मूल्य असलेले शेअर्स, पार्थ अशोक महेश्वरी यांच्याजवळील ७५९.८३ दशलक्ष रुपयांपर्यंतचे एकूण मूल्य असलेले शेअर्स विक्रीसाठी खुले केले जाणार आहेत.  

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारव्यवसाय