Join us

सफाई कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा घोळ निकाली-जोड बातमी २

By admin | Published: July 01, 2014 10:08 PM

बॉक्स..

बॉक्स..
नगरसेवकांनी समन्वयातून निर्णय घेणे अपेक्षित
प्रभागात नियमित साफसफाई होत नसल्यावर नगरसेवक आक्षेप नोंदवतात. स्वच्छता निरीक्षकांसह सफाई कर्मचारी प्रभागात फिरकतही नाहीत. त्यावर आयुक्तांनी सफाई कर्मचार्‍यांची अदलाबदल केल्याने काही नगरसेवकांनी पडद्याआडून कुजबुज सुरू केली. समितीच्या माध्यमातून नगरसेवकांनी समन्वयातून निर्णय घेणे अपेक्षित आहे. येत्या १९ जुलै रोजी सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नगरसेवकांनी त्यांच्या सूचना समितीकडे सोपवाव्यात. सभेत अंतिम निर्णय होईल.

बॉक्स..
बैठकीतही बाचाबाची
बैठकीला सुरुवात होताच माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक मदन भरगड यांनी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. चिंचोलीकर फोन उचलत नसल्यामुळे आमच्या समस्या कोणाला सांगायच्या असा, प्रश्न भरगड यांनी उपस्थित केला. त्यावर या सभेत केवळ सफाईच्याच मुद्यावर चर्चा होईल,असे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या भूमिकेवर भरगड यांनी तीव्र नाराजी दर्शवली.

कोट..
आस्थापनेवरील सफाई कर्मचारी प्रत्यक्षात किती हजर असतात, याबाबत संभ्रम आहे. याची शहानिशा केल्या जात आहे. सफाई कर्मचार्‍यांना ओळखपत्र दिल्यानंतरच खरी भानगड समोर येईल. बैठकीत पडीत वार्डांसह कचरा गाड्या घेण्यावर चर्चा झाली.
-डॉ. महेंद्र कल्याणकर, आयुक्त मनपा

कोट..
आयुक्तांचा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु जोपर्यंत पडीत वार्डांचे नियोजन होत नाही, तोपर्यंत व्यवस्था कायम ठेवण्याची सूचना केली.
- सुनील मेश्राम, अध्यक्ष, शहर सुधार समिती