नवी दिल्ली : मोबाइल सीम कार्डशी आधार क्रमांक जोडण्याचा बहाणा करून मुंबईतील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून १.३ लाख रुपये बदमाशांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
शाश्वत गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आयसीआयसीआय बँकेतील वेतन खात्यातून (सॅलरी अकाऊंट) ही रक्कम लंपास करण्यात आली आहे. गुप्ता यांनी फेसबुकवर आपली कैफियत मांडली आहे.
शाश्वत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कॉल करणाºयाने सांगितले की, ‘मी एअरटेलमधून बोलतोय. तुमचा आधार क्रमांक सीम कार्डला जोडलेला नाही. ही जोडणी न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक कायमस्वरूपी बंद केला जाईल. आपला आधार क्रमांक १२१ यावर एसएमएस करा.’ त्यानुसार गुप्ता यांनी आधार क्रमांक एसएमएस केला. भामट्यांनी त्याआधारे गुप्ता यांच्या मोबाइल सीमचे क्लोन करून त्यांच्या वेतन खात्यातील रक्कम लंपास केली.
आधार-सीम जोडणीच्या बहाण्याने खाते साफ!
मोबाइल सीम कार्डशी आधार क्रमांक जोडण्याचा बहाणा करून मुंबईतील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून १.३ लाख रुपये बदमाशांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:46 AM2017-10-18T03:46:24+5:302017-10-18T03:46:27+5:30