Join us  

ग्राहकाच्या मालमत्तेची कागदपत्रे गायब! ICICI बँकेला २५ लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 9:53 PM

'जून २०१६ मध्ये ICICI बँकेने त्यांना कळवले की, कुरिअर कंपनीने बेंगळुरूहून हैदराबाद येथील सेंट्रल स्टोरेज सुविधेत नेत असताना कागदपत्रे हरवली होती.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक ICICI बँकेत निष्काळजीपणाचे मोठे प्रकरण समोर आले आहे. कर्ज घेताना एका ग्राहकाने बँकेत सादर केलेली मूळ कागदपत्रे हरवली होती. यावर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने बँकेला फटकारले असून तक्रारदाराला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. 

Air India चा प्रवाशांना मोठा दिलासा! G20 दरम्यान फ्लाइट असेल तर प्रवासाची तारीख बदलू शकता

हे प्रकरण बेंगळुरूशी संबंधित आहे, तिथे तक्रारीनुसार, बँकेने एप्रिल २०१६ मध्ये एका ग्राहकाला १.८६ कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले होते आणि मालमत्तेची विक्री डीड आणि इतर मूळ कागदपत्रे त्याच्या ताब्यात नव्हती. पण बँकेकडून कर्ज घेतलेल्या मनोज मधुसुधनन या व्यक्तीला त्या कागदपत्रांची स्कॅन किंवा सॉफ्ट कॉपी प्रदान करण्यात आली नाही आणि त्यांना विचारले असता ते हरवल्याचे सांगण्यात आले. यानंतर मधुसुधनन यांनी अनेकवेळा बँक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण कोणतीही सुनावणी न झाल्याने त्यांनी बँकिंग लोकपालकडे मोर्चा वळवला. 

बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात हरवलेली कागदपत्रे तक्रारदार मनोज मधुसुधनन यांनी आपल्या तक्रारीत माहिती देताना सांगितले होते की, दोन महिन्यांपासून बँकेत जमा केलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी जाणून घ्यायची असताना आयसीआयसीआय बँकेने जून २०१६ मध्ये त्यांना माहिती दिली. एका कुरिअर कंपनीद्वारे बेंगळुरूहून हैदराबादमधील केंद्रीय स्टोरेज सुविधेकडे नेले जात असताना हरवल्याचे सांगितले.

या प्रकरणात, बँकिंग लोकपालने सप्टेंबर २०१६ मध्ये बँकेला मधुसूदननला हरवलेल्या कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती जारी करण्याचे निर्देश दिले, नुकसानीबाबत सार्वजनिक सूचना प्रकाशित करा आणि सेवेतील कमतरतांसाठी तक्रारदाराला २५,००० रुपये भरपाई म्हणून द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारकर्ते मनोज मधुसुधनन यांनी हे प्रकरण राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे नेण्याचा निर्णय घेतला आणि बँकेने अत्यंत निष्काळजीपणा केल्याचा आरोप आपल्या तक्रारीत केला आहे. कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती मूळ कागदपत्रांच्या जागी घेऊ शकत नाहीत. मानसिक त्रास आणि नुकसानीबद्दल मधुसूदनन यांच्या वतीने ५ कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती.