Lokmat Money > बिझनेस न्यूज > हवामान बदलामुळे देशात दूध उत्पादनावर परिणाम

हवामान बदलामुळे देशात दूध उत्पादनावर परिणाम

जगभर उष्णता वाढत असल्याने दुधाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागला आहे. त्यावर दूध उत्पादकांना ठोस उपाययोजना

By admin | Published: February 17, 2017 12:42 AM2017-02-17T00:42:31+5:302017-02-17T00:42:31+5:30

जगभर उष्णता वाढत असल्याने दुधाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागला आहे. त्यावर दूध उत्पादकांना ठोस उपाययोजना

Climate change results in milk production in the country | हवामान बदलामुळे देशात दूध उत्पादनावर परिणाम

हवामान बदलामुळे देशात दूध उत्पादनावर परिणाम

मुंबई : जगभर उष्णता वाढत असल्याने दुधाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागला आहे. त्यावर दूध उत्पादकांना ठोस उपाययोजना करण्यावर विशेष भर द्यावा लागेल. जगाला रोज ९५१.२३ दशलक्ष टन दुधाची गरज असताना जगभर उष्णता वाढत असल्याने सध्या केवळ ८६४.८६ दशलक्ष टन उपलब्ध होत आहे. ही परिस्थिती भारताचीच नसून विकसित देशातही दुधाची टंचाई भासत आहे, असे प्रतिपादन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी गोरेगाव येथे गुरुवारी सुरू झालेल्या ४५व्या डेअरी उद्योग परिषदेत काढले.
या तीन दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप राठ, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष सुभाष चंद्र मांडगे, सरचिटणीस राजेश लेले राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. ए. के. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पार पडले.
या वेळी अरुण नरके म्हणाले की, डेअरी उद्योगाने देशात ६ कोटी लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. भारत सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. पण वातावरणातील बदलांमुळे २०२० सालापर्यंत दरवर्षी दुधाचे उत्पादन तीन दशलक्ष टनाने कमी होईल असा अंदाज आहे. यामुळे या विषयावर गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक आहे.
हवामानातील उष्णतेमुळे पशुपालनावर व त्यांच्या खाद्यावर परिणाम होत असून, त्यावर उपाय करता येतील. पण गरम वातावरणात दूध लवकर खराब होते आणि त्यामुळे त्याचा उत्पादनांवरही परिणाम होत आहे, असे ते म्हणाले.
परिषदेत शास्त्रज्ञ आणि उद्योगातील तज्ज्ञ त्यांचे संशोधन आणि निष्कर्ष सादर करतील. देश-परदेशातून १५०० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत.
बल्गेरिया, चीन, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिथुआनिया, मलेशिया, नेदरलँड, यूके, यूएसए, थाडलंडचे १८० दुग्ध प्रदर्शकही सहभागी झाले असून, त्यांची उत्पादने, तंत्रे आणि सेवा या प्रदर्शनात
आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Climate change results in milk production in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.