नवी दिल्ली : हवामान बदलामुळे भारताला दरवर्षी ९ ते १0 अब्ज डॉलरचा फटका बसत आहे. २0२0पासून या शतकाच्या अखेरपर्यंत कृषी उत्पादनावरील परिणाम वाढत जाईल, असे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. एका संसदीय समितीसमोर कृषी खात्याने केलेल्या सादरीकरणात म्हटले की, हवामान बदलानुसार पीकपद्धतीत बदल न केल्यास उत्पादनातील घट वाढत जाईल. येत्या काही वर्षांत ही घट अल्प प्रमाणात असेल; २१00पर्यंत प्रमाण प्रचंड वाढलेले असेल. गहू, तांदूळ, तेलबिया, डाळी, फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन वर्षागणिक कमी होत जाईल. शेतकºयांना हवामान बदलानुसार बदलण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल, अन्यथा आणखी गरीब व्हावे लागेल. हवामान बदलावर मात करण्यास शेतकºयांना पीकपद्धतीत बदल करावा लागेल, तसेच उत्पादकतेतील चढ-उताराची भरपाई करण्यासाठी योग्य निविष्टांचा वापर करावा लागेल.ज्या भागातील तांदळासारख्या पिकाची उत्पादकता चीनसारख्या शेजाºयांइतकीही नाही त्या भागात हे आव्हान तातडीने पेलावे लागेल़ आधीच कमी उत्पादकता असल्याने हवामान बदलामुळे परिस्थिती विकोपाला जाईल. भारत तेलबिया, डाळी आणि अगदी दूधही आयात करणारा देश बनेल. २0१६-१७च्या तुलनेत २0३0मध्ये भारताला ७0 दशलक्ष टन अधिक अन्नधान्याची गरज लागेल, असेही या सादरीकरणात नमूद करण्यात आले आहे.>बटाट्याचे उत्पादन वाढेलकृषी मंत्रालयाने म्हटले की, बहुतांश पिकांच्या उत्पादनात हळूहळू घट होताना दिसेल. तथापि, पश्चिम किनारपट्टीच्या भागात सोयाबीन, हरभरा, शेंगदाणा यांचे उत्पादन वाढू शकते. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात बटाट्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि दक्षिण पठारासह उर्वरित भारतातील बटाटा उत्पादनात मात्र घट होईल.
हवामान बदलाचा भारताला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:32 AM