इंदूर : चालू वित्त वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी या कालावधीत किमान शिल्लक (मिनिमन बॅलन्स) नसलेली ४१.१६ लाख बचत खाती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) बंद केली. मध्य प्रदेशातील नीमच येथील चंद्रशेखर गौड यांनी बँकेकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती.एसबीआयमध्ये ४१ कोटी बचत खाती आहेत. यातील १६ कोटी खात्यांना मिनिमन बॅलन्सचे नियम लागू नाहीत. पंतप्रधान जनधन योजना, आधारभूत बचत बँक ठेव खाती, पेन्शनर्स, अल्पवयीन, सामाजिक सुरक्षा लाभधारकांची खाती यांना सूट देण्यात आली आहे. वित्तमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर २0१७ या काळात खात्यावर किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना लावलेल्या शुल्कापोटी एसबीआयला तब्बल १,७७१.६७ कोटी रुपये मिळाले. ही रक्कम बँकेच्या दुसºया तिमाहीतील नफ्यापेक्षा जास्त आहे. (वृत्तसंंस्था)
मिनिमम बॅलन्स नसलेली ४१.१६ लाख खाती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:47 AM