Budget Share Market News: आज(दि. 1) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये कॅपेक्स बूस्ट, इलेक्ट्रिक व्हेईकल पुश, रेल्वेवर फोकस, लखपती दीदी योजना आणि सौर महत्त्वाकांक्षा, या पाच गोष्टींवर भर देण्यात आला. पण, शेअर बाजारावर या अर्थसंकल्पाचा उलट परिणाम पाहायला मिळाला.
बीएसई सेन्सेक्सने 107 अंकांनी घसरुन 71645 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28 अंकांनी घसरुन 21697 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गुरुवारच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात कमजोरी नोंदवली गेली, तर निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढी दिसून आली.
शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड, सिप्ला आणि एसबीआय लाइफचे शेअर्स होते, तर नुकसान झालेल्या शेअर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि डॉ. रेड्डीजचे शेअर्स होते. रतन टाटा समूहाची दिग्गज कंपनी टायटनचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले, पण त्याचा शेअर्सवर जास्त परिणा दिसून आला नाही.
शेअर बाजारातील मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाले, तर उर्जा ग्लोबलचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढले. कामधेनू, एनएमडीसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, ओम इन्फ्रा, एचडीएफसी लाइफ, जिओ फायनान्शियल, इंजिनिअर्स इंडिया, एचडीएफसी बँक, एक्साइड, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, ग्लोबस स्पिरीट, टाटा मोटर्स, ब्रँड कॉन्सेप्ट, युनि पार्ट्स इंडिया, स्टोव्ह क्राफ्ट, पटेल इंजिनीअरिंग, नेस्ले इंडिया, ओएनजीसी यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली.