लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आॅनलाइन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर ७० हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारने उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे ३० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारण्यात आल्याची माहिती राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
संघटनेची राज्य बैठक २४ रोजी जळगाव येथे झाली. त्यानंतर शिंदे म्हणाले की, आॅनलाइन औषधांची विक्री ही घातक असून त्याचे विपरित परिणाम होत आहेत, असे असले तरी त्यावर कारवाई होत नाही. यासाठी संघटनेच्या वतीने तब्बल ७० हजार आक्षेप नोंदविण्यात आले होते. तसेच आरोग्य खात्यासह कुटुंबकल्याण मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय येथे निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च २०१७ रोजी केंद्र सरकारने अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अहवालानुसार नोटिसा काढल्या. या नोटीसची मुदत १५ एप्रिल रोजी संपली असली तरी त्यानंतर आतापर्यंत कार्यवाही होत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
औषध विक्रेत्यांचा ३० मे रोजी देशव्यापी बंद
आॅनलाइन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर ७० हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 01:03 AM2017-05-25T01:03:57+5:302017-05-25T01:03:57+5:30