Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंदमुळे सरकारी बँकांचे कामकाज थंडावले, बँकांमध्ये शुकशुकाट

बंदमुळे सरकारी बँकांचे कामकाज थंडावले, बँकांमध्ये शुकशुकाट

कामगार संघटनांनी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:30 AM2020-01-09T03:30:52+5:302020-01-09T03:31:01+5:30

कामगार संघटनांनी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

Closure hampered the functioning of government banks, shook the banks | बंदमुळे सरकारी बँकांचे कामकाज थंडावले, बँकांमध्ये शुकशुकाट

बंदमुळे सरकारी बँकांचे कामकाज थंडावले, बँकांमध्ये शुकशुकाट

नवी दिल्ली : कामगार संघटनांनी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सरकारी बँकांच्या देशभरातील शाखांमध्ये फारच कमी कर्मचारी दिसत होते, तर काही ठिकाणी एखाद-दुसराच कर्मचारी होता. त्यामुळे फारसे आर्थिक व्यवहार झाले नाहीत. बँकांच्या दैनंदिन कामकाजावर बराच परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
या बंदचा परिणाम एटीएमवर तितकासा जाणवला नाही. विविध एटीएममधून पैसे काढण्यासाठी बरीच गर्दी दिसत होती. त्यामुळे संध्याकाळनंतर एटीएममध्ये फारशी रोख रक्कम शिल्लक राहणार नाही आणि गुरुवार सकाळी एटीएममध्ये नव्या रकमेचा भरणा केला जाईपर्यंत चणचण भासू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आदी मोठ्या शहरांमध्ये बँकांचे कामकाज खूपच कमी झाले. पैसे काढणे, चेक वटणे, खात्यात पैसे जमा करणे आदी कामांवर परिणाम झाला. आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन, बँक इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, बँक कर्मचारी सेना इंडियन नॅशनल बँक आॅफिसर्स आॅर्गनायझेशन आदी १0 संघटनांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
स्टेट बँक आॅफ इंडियाने कामकाजावर फार परिणाम झाला नाही, असा दावा केला आहे, पण बँक आॅफ महाराष्ट्र, देना बँक, सिंडिकेट बँक, बँक आॅफ इंडिया,
युनियन बँक आदी बँकांवर कर्मचाºयांच्या अनुपस्थितीचा सर्वाधिक परिणाम झाला. त्यांचे कामकाज जणू बंदच होते. या सरकारी बँकांमध्ये कर्मचाºयांच्या हितासाठी काम करणाºया संघटनांचे
प्राबल्य आहे.
>खासगी, सहकारी बँका सुरू
खासगी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. अनेकांची एकाहून अधिक बँकेत खाती असतात. एखादे खासगी बँकेत असते. खासगी बँकांंमध्ये आज गर्दी दिसून आली. सहकारी बँकांतील कर्मचारीही संपात सहभागी नव्हते. त्यामुळे त्यांचे कामकाजही सुरू होते.

Web Title: Closure hampered the functioning of government banks, shook the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.