Join us

कपडे महागणार

By admin | Published: June 05, 2017 12:22 AM

वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) कापड उत्पादन आणि विशेषत: कापसापासून बनणारे सूत व फॅब्रिक उत्पादने महाग होणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) कापड उत्पादन आणि विशेषत: कापसापासून बनणारे सूत व फॅब्रिक उत्पादने महाग होणार आहेत. जीएसटी परिषदेने यावर पाच टक्के कर लावला असून १ जुलैपासून नव्या कराची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कापसापासून बनणारे सूत आणि फॅब्रिकवर यापूर्वी शून्य टक्के कर होता. काही राज्ये यावर दोन ते चार टक्के व्हॅट आकारत आहेत. एईपीसीचे अध्यक्ष अशोक जी. रजनी यांनी सांगितले की, कापड उद्योग एका सोेप्या कर व्यवस्थेची अपेक्षा करून आहे. काही दरांच्या घोषणेवरून संभ्रम निर्माण झाला आहे. कापड उत्पादनावर पाच टक्के कर लावल्यामुळे उत्पादन दरात वाढ होईल. कापूस, फॅब्रिक्स, सूती दोरे आणि ज्यांचे मूल्य एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी पाच टक्के जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. एक हजार रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या कपड्यांवर १२ टक्के कर लागणार आहे. सिंथेटिक आणि फायबरवर १८ टक्के दराने कर लागणार आहे. साउथ इंडिया मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. सेंथिलकुमार म्हणाले की, आतापर्यंत बहुतांश कापड उद्योग २००४ च्या व्यवस्थेवर आधारित होता आणि सुती, फॅब्रिक्सवर व्हॅट शून्य होता. आता पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने कापड उद्योगातील एक मोठा भाग कराच्या अंतर्गत येणार आहे. ग्लुकोज बिस्किटांचे दर वाढणार ग्लुकोज बिस्किटांवरील कर १८ टक्के करण्यात आल्याने या बिस्किटांच्या दरात वाढ होणार आहे. सध्या यावर ९ ते १० टक्के कर आकारण्यात येतो. १०० रुपये प्रति कि लोच्या आत दर असणाऱ्या बिस्किटांवर १८ टक्के कर लागणार आहे. प्रीमियम बिस्कीट किंवा ज्यांचे दर १०० रुपये प्रति किलोपेक्षा अधिक आहेत त्यांना १६ ते १७ टक्के कर लागणार आहे. देशातील बिस्किटांची बाजारपेठ २६ हजार कोटी रुपयांची आहे. >सोन्यावरील तीन टक्के कराचे स्वागत जीएसटीत सोन्यावर ३ टक्के कर निश्चित करण्यात आला असून या निर्णयाचे सराफा व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. सध्याच्या १० टक्के आयात करासह आता ग्राहकांना १३ टक्के कर द्यावा लागणार आहे. म्हणजेच १० टक्के आयात कर, १ टक्का मूल्यवर्धित कर, १ टक्का अबकारी शुल्क आणि ०.५ टक्के उपकर यांचाही यात समावेश आहे. >कपड्यांवर लागणारे कर 0०%सिल्क आणि ज्यूट05%सूती आणि नॅचरल फायबर 18%मानवनिर्मित फायबर 18%मानवनिर्मित सूत 05%सर्व प्रकारचे सूत 05%फॅब्रिक 12%एक हजार रु.पेक्षा अधिक 05%एक हजार रु.पेक्षा कमी