Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय चाललंय काय? राज्यात सीएनजी, पीएनजी पुन्हा ५ रुपयांनी महाग; सात दिवसांत १२ रुपये दरवाढ

काय चाललंय काय? राज्यात सीएनजी, पीएनजी पुन्हा ५ रुपयांनी महाग; सात दिवसांत १२ रुपये दरवाढ

खर्च वाढल्यामुळे कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या असून ही दरवाढ मंगळवारी रात्रीपासून लागू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 06:47 AM2022-04-14T06:47:57+5:302022-04-14T06:48:44+5:30

खर्च वाढल्यामुळे कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या असून ही दरवाढ मंगळवारी रात्रीपासून लागू झाली आहे.

CNG and PNG again expensive by Rs 5 in the state Rs 12 increase in seven days | काय चाललंय काय? राज्यात सीएनजी, पीएनजी पुन्हा ५ रुपयांनी महाग; सात दिवसांत १२ रुपये दरवाढ

काय चाललंय काय? राज्यात सीएनजी, पीएनजी पुन्हा ५ रुपयांनी महाग; सात दिवसांत १२ रुपये दरवाढ

मुंबई :  

राज्यातील नागरिकांना महागाईने पुन्हा एकदा झटका दिला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) ने सीएनजी आणि पीएनजी दरात पुन्हा एकदा प्रति किलो ५ रुपये आणि ४.५० रुपयांनी वाढ केली आहे. खर्च वाढल्यामुळे कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या असून ही दरवाढ मंगळवारी रात्रीपासून लागू झाली आहे.

एमजीएलने यापूर्वी ६ एप्रिल रोजी सीएनजीच्या किमतीत ७ रुपयांनी वाढ केली होती. त्याच वेळी, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ केली होती. प्रमुख गॅस पुरवठा कंपनी महाराष्ट्र गॅस लिमिटेडने ३१ मार्च रोजी सीएनजीच्या किमतीत प्रति किलो ६ रुपये आणि पीएनजीच्या दरात ३.५० रुपये प्रति घनमीटर कपात केली होती. राज्य सरकारने या इंधनांच्या किमतींवरील व्हॅटमध्ये ३ टक्के कपात केल्याचा फायदा ग्राहकांना झाला होता. मात्र त्यानंतर लगेचच कंपन्यांनी दरवाढ केली आहे.

आठवड्यात १२ रुपयांनी महाग
आठवडाभरात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १२ रुपये आणि पीएनजीच्या दरात ९.५ रुपये प्रति घनमीटरने वाढ झाली आहे. मुंबईत आता सीएनजी ७२ रुपये प्रति किलो आणि स्वयंपाकघरात वापरला जाणारा पीएनजी ४५.५० रुपये प्रति घनमीटर आहे.

Web Title: CNG and PNG again expensive by Rs 5 in the state Rs 12 increase in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.